शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंता पवार यांची चौकशी

By admin | Updated: January 23, 2016 00:47 IST

बुर्ली पेयजल अपहार प्रकरण : दोषींवर बडतर्फीची कारवाई

सांगली : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या बुर्ली (ता. पलूस) येथील नळपाणी पुरवठा कामात ६१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी निलंबित तत्कालीन प्रभारी उपअभियंता एस. एस. पवार यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून २०११-१२ मध्ये बुर्ली येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १.२५ कोटी रुपये मंजूर झाले होते. या योजनेवर १.१३ कोटी रुपये खर्च झाल्याचे मूल्यांकन तत्कालीन शाखा अभियंता व पलूसचे प्रभारी उपअभियंता पवार यांनी केले होते. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत चौकशीचे आदेश अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तासगाव उपविभागाचे उपअभियंते आर. आर. सरक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सरक यांच्या अहवालानुसार बुर्ली येथील योजनेच्या कामांचे मूल्यांकन ५२ लाख रुपये झाले होते. तरीही पवार यांनी ते १.२५ कोटी रुपयांचे केले. यामध्ये ६१ लाख रुपयांची तफावत असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. हा अपहार असल्याने उपअभियंता पवार यांच्या निलंबनाचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, पवार यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. या चौकशीत पवार दोषी आढळले तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यातबुर्ली येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या फर्मला मिळाला होता. या फर्ममध्ये अधिकाऱ्याची पत्नी भागीदार असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणी होत आहे. ठेकेदाराच्या कामाची चौकशी होणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.