शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून करताहेत व्याज आकारणी

By admin | Updated: December 8, 2015 00:37 IST

बँक आॅफ इंडियामधील प्रकार : लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक कर्जावर १०० टक्के व्याज माफ असताना विद्यार्थ्यांकडून व्याज आकारणी करणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या पिंगुळी व कुडाळ शाखेविरोधात तक्रार अर्ज आल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लोकशाही दिनात दिली. लोकशाही दिनानंतर आयोजित ते पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी शरदचंद्र शिरोडकर, नायब तहसीलदार शरद गोसावी उपस्थित होते.या लोकशाही दिनात दहा अर्ज आले होते. यापैकी चार अर्ज हे लोकशाही दिनाच्या निकषात न बसणारे असल्याने निकाली काढण्यात आले.प्रत्येकी दोन अर्ज जिल्हा परिषद व महसूल विभागाशी संबंधित होते. कांदळगांव (ता. मालवण) येथील मौखिक परवानगीवर शौचालय बांधकाम केल्यामुळे ते पाडून टाकण्याची कारवाई करणाऱ्या ग्रामपंचायती विरोधातही तक्रार प्राप्त झाली आहे.जिल्ह्यात २३ केंद्रांवर भात खरेदी मंगळवारपासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील भाताची प्रतही दुय्यम असल्यामुळे १४१० रुपये प्रती क्विंटल दर भाताला मिळणार आहे. जिल्ह्यात धान्य उतरविण्यासाठी रॅक उपलब्ध झाल्यावर तसेच या रॅकपासून मुख्य रस्त्यापर्यंत येणारा ६०० मीटरचा रस्ता पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील धान्याची अडचण दूर होईल असे यावेळी सांगण्यात आले.सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्कची तात्पुरती देखभाल करण्याचे कंत्राट कुडाळ येथील बजाज मिल्स या कंपनीने घेतले आहे. या अंतर्गत टाऊन पार्कमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, बसण्याचे बाकडे लावण्यात येणार आहेत. येथील सुशोभिकरणही त्यांच्यामार्फत केले जाणार आहे असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कुडाळ, पिंगुळीतील शाखेविरोधात तक्रारशैक्षणिक कर्ज योजनेखाली विद्यार्थ्यांना देण्यात येणारे कर्ज हे १०० टक्के व्याज माफ करून दिले जाते. मात्र, कुडाळ तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर बँक आॅफ इंडिया कुडाळ व पिंगुळी या दोन शाखांनी व्याज आकारणी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल झाला. या संदर्भात बँक आॅफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले.