शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना

By admin | Updated: November 6, 2015 23:40 IST

रणजित देसाई : कृषी समिती सभेत खळबळजनक आरोप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी 30 लाखांचीच नुकसानभरपाई

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फळपीक विमा योजनेंतर्गत सुमारे ४ कोटींचे हप्ते विमा कंपनीला भरण्यात आले, तर नुकसानीपोटी केवळ विमा कंपनीकडून ४ कोटी ३० लाख मिळाले. विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे, असा खळबळजनक आरोप सभाध्यक्ष रणजित देसाई यांनी कृषी समिती सभेत केला. विमा कंपनीचे प्रतिनिधी जर सभेत येऊन योजनेची परिपूर्ण माहिती देत नसतील तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेऊ नये असे जाहीर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेची कृषी समितीची सभा कृषी सभापती तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, रेश्मा जोशी, सोनाली घाडीगांवकर, विभावरी खोत, दिलीप रावराणे, योगिता परब, प्रमोद सावंत आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फळपीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, या योजनेपोटी शेतकरी व शासन हिस्सा म्हणून संबंधित विमा कंपनीला सुमारे ४ कोटी एवढा (प्रीमियम) हप्ता जमा करण्यात आला. मात्र, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे तीन ते चार दिवस अवेळी पाऊस पडूनही केवळ एक दिवसाचे नुकसान दाखवून नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ३० लाख भरपाई देण्यात आली. विमा कंपनीकडून देण्यात आलेली नुकसानभरपाई अल्प स्वरूपात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विमा कंपनीची ८ ते १० पर्जन्य व तापमानमापक केंद्रे बंद स्थितीत आहेत. मग कोणत्या आधारावर ही नुकसानभरपाई विमा कंपनीने दिली. विमा कंपनीचे निकष जिल्ह्यात लागू होत नाहीत. ही पॉलिसीच सदोष आहे. विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबविली जात असल्याचा खळबळजनक आरोप सभापती रणजित देसाई यांनी सभेत केला, तर या विमा योजनेची माहिती, निकष याबाबत बोलवूनही विमा कंपनीचे प्रतिनिधी सभेत येत नाहीत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तरी जर विमा कंपनीकडून परिपूर्ण माहिती दिली जात नसेल तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होऊ नये असे आवाहन शेतकऱ्यांना करावे लागेल, असे सभेत स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी व अनियमित झाल्याने भातपिकाचे सुरुवातीलाच पेरणीच्यावेळी नुकसान झाले. त्यानंतर आता भात कापणीवेळी पडलेल्या पावसानेही शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तत्काळ नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी केली. मात्र, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने पंचनामे केलेले नाहीत. मात्र, आदेश प्राप्त होताच नुकसानीचे पंचनामे करू, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावर सभापती रणजित देसाई यांनी झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार करा. तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. नुकसानीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आदेश देतील. तसा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहाच्या भावना कळवा, अशी सूचना दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात आलेले बंधारे आॅक्टोबरमध्येच कोरडे पडलेले दिसत आहेत. तरी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून किती बंधारे बांधले, किती बंधाऱ्यात पाण्याचा साठा झाला आहे याचा अहवाल पुढील सभेत द्या, असे आदेश सभापती रणजित देसाई यांनी संबंधित राज्य कृषी विभागाला दिले. (प्रतिनिधी)