शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुली घाटी समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: February 4, 2015 23:57 IST

वाहनचालकांतून नाराजी : जीर्ण झाडे, रस्त्याची दुरवस्था, वाहतुकीची कोंडी

संतोष परब- मडुरा -मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाताना लागणारी इन्सुली घाटी ही समस्यांच्या विळख्यात सापडलेली दिसून येत आहे. इन्सुली घाटीत रस्त्याच्या दुरवस्थेसह धूप झाल्याने उन्मळून पडलेले वृक्ष यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्याने ही घाटी वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे. या घाटीत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असूनही येथील समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या घाटीत होणाऱ्या अपघातांमुळे आतापर्यंत कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या घाटीतील समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी होत आहे.मुंबई, पुणे, कोल्हापूरमार्गे गोव्यात जाणारी मोठी अवजड वाहतूक याच घाटीतून होत असते, त्यामुळे या घाटीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे व घाटीतील धोकादायक ‘यू’ वळणामुळे वारंवार अपघातांची मालिका होत आहे. या अपघातामुळे तातडीची उपाययोजना न झाल्यामुळे येथे कित्येक तास वाहतुकीची कोंडी होताना दिसते. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने देशातील तसेच महाराष्ट्रातील पर्यटक सावंतवाडीहून गोव्यात जाताना या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांना या घाटीने प्रवास करणे अतिशय जिकिरीचे होते. सावंतवाडी हे तालुक्याचे स्थान असल्यामुळे बांदा, मडुरा, इन्सुली अशा मोठ्या दशक्रोशीतून लोकांचे ये-जा याच मार्गवरुन होत असते. इन्सुली घाटीला पर्यायी झाराप- पत्रादेवी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गोव्याहून तसेच बांद्याहून सावंतवाडी शहरात जाण्यासाठी इन्सुली घाटीतील रस्ताच हा वाहनचालकांसाठी पर्यायी ठरतो. तालुक्यातील महत्त्वाची शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापने सावंतवाडी शहरात असल्याने तसेच सावंतवाडी हे पर्यटन शहर असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते.कोसळण्याच्या स्थितीतील झाडे तोडावीतघाटीतील दुतर्फा असलेली जुनाट झाडे ही जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ही झाडे एखादेवेळीस वाहनांवर पडल्यास यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षभरात या घाटीतील झाडे कित्येकदा उन्मळून पडली आहेत. मात्र, सुदैवाने अपघात झाले नाहीत. यामुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे तोडून टाकावीत, अशी मागणी होत आहे. - नारायण राणे, पंचायत समिती सदस्य, सावंतवाडीदिशादर्शक फलकांचीही दैना बांदा- सावंतवाडी मार्गावरील इन्सुली घाटरस्ता हा समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. घाटीतील दिशादर्शक फलकांची दैना झाली आहे. घाटीत संरक्षक कठडे नसल्याने वाहनाचा अपघात झाल्यास वाहनचालकांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. घाटीतील रस्ते हे अरुंद असल्याने यामुळे अवजड वाहने आल्यास घाटीत वाहनांची कोंडी होते. गोव्यातून मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद येथे जाणाऱ्या खासगी बसेस याच घाटीतून जातात.गोवा, दोडामार्ग, बांदा परिसरातून होणारी एसटी वाहतूक ही पुर्णपणे याच घाटीतून होत असते. घाटीतील रस्त्यांची साईडपट्टीदेखील खचल्याने दुचाकीचालकांना याचा त्रास होत आहे. इन्सुली घाटीत अपघातांची मालिका घडूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचा समस्यांकडे कानाडोळा होत आहे. येथील समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठविला. मात्र, या घाटीतील समस्यांचे अद्यापही निराकरण करण्यात आले नाही. गोवा राज्यातील पर्यटन हंगाम सुरु झाल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे.