शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सवेश नाट्यगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली

By admin | Updated: December 17, 2014 22:50 IST

नाट्यदर्शन कार्यक्रम : सरस्वती संगीत विद्यालयाचा पुढाकार

वेंगुर्ले : येथील श्री सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘नाट्यदर्शन’ कार्यक्रमात सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सवेश नाट्यगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. येथील सिध्दिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवगड येथील संगीतज्ञ डॉ. भा. वा. आठवले यांच्या हस्ते व युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष विलास गावडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अरुण गोगटे, संगीततज्ञ भाई शेवरे, मनमोहन दाभोलकर, दिगंबर नाईक, रवी रेगे, अरुण गोगटे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तेजस मेस्त्री याच्या ‘निराकार आेंकार...’ या गीताने झाली. त्यानंतर काजल परब हिने ‘नाथ हा माझा...’ चिन्मयी खानोलकरने ‘कोण तुज सम सांग...’, वैभवी नाईक हिने ‘धनराशी जाता...’, इंद्राणी कडुलकर हिने ‘मर्मबंधातली ठेव ही...’, अंकिता आरोलकरने ‘जगी या श्वास वेड्यांचा...’, आदिती गोगटे हिने ‘विकल मन आज...’, श्वेता मेस्त्री हिने ‘रमवाया जाऊ...’, जागृती पेठे हिने ‘लागी करेजवा कटार...’, श्रीकृष्ण परब याने ‘जय जय कुंजविहारी...’ ही गीते सादर केली. अंकिता आरोलकर हिने ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातील ‘दूर दूर व्हा मत्स्यांनो...’, ‘जन्म दिला मज ज्यांनी....’, तव भास अंतरा झाला...’, ‘गर्द संगाती रान साजणी ही...’ तेजस मेस्त्री याने ‘फुलला दारी तुझ्या धिवरा..’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला...’, गुंतता हृदय हे...’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा...’ या गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी अनघा गोगटे यांनी सादर केलेल्या ‘तम निशेचा सरला...’ या भैरवीने या तीन तास रंगलेल्या नाट्य संगीताच्या रजनीची सांगता झाली. या सर्व गायकांना अमित मेस्त्री (हार्मोनियम), भालचंद्र केळुसकर (आॅर्गन), प्रसाद मेस्त्री (तबला) यांनी साथ दिली. निवेदक म्हणून संजय कोन यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास सुमारे ८०० संगीतप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)