शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विहिरीमधील ‘टीसीएल’ पावडरच्या प्रमाणाची चौकशी

By admin | Updated: May 19, 2016 00:11 IST

शेखर सिंह : साळिस्तेतील साथरोग प्रकरण

सिंधुदुर्गनगरी : साळिस्ते येथील उद्भवलेल्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी तेथील पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीमध्ये योग्य प्रमाणात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांनी देखील बुधवारी साळिस्ते गावास भेट दिली. साळिस्ते येथे १२ मे रोजी अतिसाराची लागण झाली होती. या चार-पाच दिवसांत ४८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती व साळिस्ते येथील सर्व पाण्याच्या उद्भवांचे पाणी तपासण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ज्या विहिरींच्या पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे समजले होते, त्या विहिरीतील पाण्याची टी.सी.एल. तपासणी करण्यात आली होती. त्यात पुरेसा २७ टक्के इतका टी.सी.एल.चा अंश टाकण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वी त्या पाण्यात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या पाणीटंचाईच्या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी हा विहिरीतील गाळ काढणे, स्रोतांचे बळकटीकरण करणे, अशा कामांसाठी वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २० कोटी रुपये प्राथमिक निधी दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. मात्र साळिस्ते येथील या कामासाठी तो वापरण्यात आला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपासाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत सुरु असल्याचेही सिंह यांनी सांगितले.जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र ती भीषण नाही, असे स्पष्ट करत शेखर सिंह म्हणाले की, मागच्यावर्षी कमी पडलेला पाऊस व त्यामुळे कमी झालेला जलसाठा यामुळे थोडी पाण्याची कमतरता जिल्ह्यात जाणवत आहे. मात्र कुठल्याही वाडीत अगदीच पाणी नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात नाही. स्थानिक पातळीवर थोडीबहुत पाण्याची कमतरता आहे हे मान्य करावे लागेल. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती जिल्ह्यात इतरत्र कोठेही नाही. शिक्षक बदल्यांच्या आॅर्डरवर सहीशासनाची २० पटसंख्येच्या आतील शाळा समायोजन करण्याची संकल्पना स्तुत्य आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आर.टी.ई. कायद्यानुसार तीन किलोमीटरच्या टप्प्यात शाळा असणे आवश्यक आहे. मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ते थोडे कठीण आहे. तसेच यानुसार कार्यवाही झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे पैसे कोण देणार किंवा कसे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे एका मिटींगनिमित्त गेलो असल्याने शिक्षकांच्या बदल्यांच्या आॅर्डरवर सही करायची राहून गेले होते. त्या आॅर्डरवर मंगळवारी रात्री सह्या केल्या असून, त्या त्या जागेवर शिक्षक नियुक्त होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)