शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी गुलदस्त्यात

By admin | Updated: February 9, 2015 01:21 IST

मात्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत.

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठासह परराज्यातील इतर विद्यापीठांमधून बोगस पदवी धारण केलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला होता. तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी अद्याप या चौकशीबाबत काहीही झालेले नाही. ही चौकशी बासनात गुंडाळल्याची चर्चा सध्या शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्या अनेक जणांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्यातील मुंबई मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून अनेक पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत. इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या करणारे आणि जिल्हा परिषदेतील काही प्राथमिक शिक्षक उत्तर प्रदेशातील अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदव्या धारण करुन त्याद्वारे पदोन्नती मिळविण्यासाठी धडपड करीत होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने पदोन्नती दिली होती. त्यानंतर अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविलेल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल जिल्ह्यातील काही शिक्षकांनीच पदवी बोगस असल्याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल उशिरा का होईना, शिक्षण विभागाने घेतली होती. शिक्षण समितीचे तत्कालीन सभापती सतीश शेवडे यांच्या कालावधीत अलाहाबाद विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या पदवीधर शिक्षकांची पदोन्नती नाकारण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकारे पदवी मिळवलेल्या शिक्षकांना पदोन्नती नाकारण्यात आली होती. याप्रकरणी शिक्षण समितीच्या सभेत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अलाहाबाद विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले होते. शिक्षण समितीच्या चौकशीच्या निर्णयानंतर याप्रकरणी चौकशी होणार हे निश्चित झाले होते. मात्र, हा निर्णय घेऊन तीन महिने उलटले तरी अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी गुंडाळली काय, अशी चर्चा शिक्षकवर्गामध्ये सुरु असून, ही चौकशी झाल्यास अनेक शिक्षक अडचणीत येण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)