शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

खाण व्यवसायाची चौकशी करा

By admin | Updated: October 24, 2015 00:30 IST

सखाराम गवस : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उपोषणाचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे गावात कोणतीही शासकीय परवानगी व सहहिस्सेदारांची संमती न घेता चिरेखाण व्यवसाय राजरोसपणे चालू आहे. संबंधितांची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहहिस्सेदारांना घेऊन उपोषण करणार असल्याचे निवेदन मंगळवारी नेतर्डे येथील सखाराम चंद्रकांत गवस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे येथील सखाराम चंद्रकांत गवस यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन दिले असून, त्यात नेतर्डे गावातील सर्व्हे नं. ४४ मध्ये ३५० भागीदार शेतकऱ्यांची मालकी आहे. या सर्व्हे नंबरमध्ये गेली पाच वर्षे कोणत्याही सहहिस्सेदाराची संमती किंवा कुलअखत्यारपत्र न घेता बेकायदेशीररित्या चिरेखाण व्यवसाय सुरु आहे. त्यांनी याकरीता महसूल खात्याची परवानगी घेतलेली नाही आणि जरी घेतलेली असेल तरी ३५० भागीदार (हिस्सेदार) असतानाही परवानगी कशी देण्यात आली? या खाणी चालू असल्याचे मंडल अधिकारी व तलाठी तसेच तहसीलदार कार्यालय यांना माहिती असूनही डोळेझाक कशासाठी केली जात आहे? जर महसूल खात्याने रेती ट्रक किंवा चिऱ्याचा ट्रक पकडला तर हजारो रुपये दंड होतो. मग नेतर्डे गावात दिवसरात्र चालू असलेल्या चिरेखाणी व बेकायदेशीर चिरे वाहतूक याला कोणाचे अभय आहे? हे महसूल खात्याचे नुकसान नाही का? असे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित चिरेखाण व्यावसायिकांना याबाबत विचारले असता धमकावले जात आहे. त्यांचे परराज्यातील कामगार रात्री - अपरात्री गावात फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बेकायदेशीर चिरेखाणी पहाटे ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र, कोणताही वरिष्ठ अधिकारी याठिकाणी भेट देणार असल्यास त्यांना तलाठी किंवा अन्य कार्यालयाकडून आगाऊ माहिती दिली जाते. त्यामुळे तेवढ्या कालावधीपुरत्या खाणी बंद ठेवल्या जातात.सर्व्हे नं. ४४/१ अ हा सामाईक असल्याने व गेली कित्येक वर्षे हा बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय चालू असल्याने कोट्यवधींचा दंड झाल्यास तो आम्हा सहहिस्सेदारांना भरणे परवडणारे नाही. तरी या बेकायदेशीर चिरेखाणी व्यवसायावर तत्काळ कारवाई करून दंडासहित रॉयल्टी वसूल करावी. तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सखाराम गवस यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)नेतर्डे येथे कोणतीही शासकीय परवानगी व सहहिस्सेदारांची संमती नसताना चिरेखाण व्यवसाय सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विरोधात सखाराम गवस यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे धाव घेतली आहे.सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डेै येथे व्यवसाय सुरू.३५० हिस्सेदारांची परवानगी घेतलेली नाही.दंडासहित रॉयल्टी वसूल करण्याची मागणी.पहाटेपासून व्यवसाय सुरू.