शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ रुग्णांना इंजेक्शनची बाधा

By admin | Updated: April 18, 2015 00:03 IST

रुग्ण अत्यवस्थ : कुडाळ रुग्णालयातील घटना

कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नऊ रुग्णांना इंजेक्शनची बाधा झाली असून, हे सर्व रुग्ण अत्यवस्थ आहेत. यातील एका रुग्णाला उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता हा रुग्ण चांगल्या स्थितीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. डी. वजराटकर यांनी दिली. ही घटना गुरुवारी रात्री ८च्या सुमारास घडली. या औषधांच्या तपासणीची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.कुडाळ ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे सुमारे ४० रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता सर्व प्रकारच्या रुग्णांना जंतू संसर्ग होऊ नये, याकरिता दररोजप्रमाणे जंतू संसर्ग प्रतिजैवक इंजेक्शन देण्यात येत होते. साडेसात वाजेपर्यंत नऊ रुग्णांना इंजेक्शन देऊन झाली असता यातील काही रुग्णांना थंडी-ताप, डोकेदुखी ही लक्षणे दिसू लागली व या नऊ रुग्णांची तब्येत ढासळली. इंजेक्शन देऊन झाल्यावर अर्ध्या तासातच या इंजेक्शनमुळे पेशंटना त्रास जाणवू लागला. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. या रुग्णांमध्ये नऊ वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृद्धेचाही समावेश होता. इंजेक्शनचा त्रास जाणवू लागल्याचे लक्षात येताच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी अ‍ॅलर्जी होऊ नये, याकरिता तातडीने उपचार सुरू केले. एक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल नऊपैकी अलीमुद्दिन खान (वय ५८, रा. नेरूर) यांची प्रकृती गंभीर बनत चालली असल्याने त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप, सर्दी, शस्त्रक्रिया, प्रसुती झालेल्या माता अशा सर्व रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये, याकरिता प्रतिजैवक औषध म्हणून सिफोट्यॅगझिम’ हे इंजेक्शन दिले जाते. याही ठिकाणी रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येत होते. या इंजेक्शनमुळेच रुग्णांना त्रास जाणवू लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. त्रास झालेल्या रुग्णांची नावेनसरीन मुजावर (वय ३८, पिंगुळी), साकील मुजावर (१२, नेरूर), सखाराम नाईक (६७, केरवडे), प्रमिला चव्हाण (२२, पिंगुळी), सत्यवती चव्हाण (४७, हिर्लोक), अश्विनी पिंगुळकर (२०, मांडकुली), प्रमिला नेरूरकर (४५, नेरूर), अलामुद्दिन खान (५८, नेरूर), महादेव सावंत (५५, पोईप) तपासणी होणे गरजेचे ही इंजेक्शन महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा रुग्णालय व नंतर ग्रामीण रुग्णालयात आली आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात १४ सप्टेंबर २०१४ रोजी आलेल्या या इंजेक्शनपैकी ३५५० इंजेक्शने शिल्लक आहेत. या इंजेक्शनबरोबरच जिल्ह्यातील तसेच राज्यातील इंजेक्शनची तपासणी होणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यक्तीने हाताने पावडर भरली असावी : वजराटकरइंजेक्शनमधून अशा प्रकारचा त्रास होणे, ही दहा वर्षांतील पहिलीच घटना आहे. इंजेक्शन बनविणाऱ्या कंपनीमधील एखाद्या कामगाराने जर का हाताने इंजेक्शनची पावडर भरल्यास जंतूसंसर्ग होण्याची शक्यता डॉ. वजराटकर यांनी वर्तविली. या इंजेक्शनमुळे त्रास जाणवू लागल्याने आता या इंजेक्शनचा वापर योग्य तपासणी अहवाल येईपर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वजराटकर यांनी दिली. इंजेक्शन तपासणीकरिता मुंबईलाहे इंजेक्शन जंतूसंसर्ग होऊ नये, म्हणून आम्ही देतो. मात्र, शुक्रवारी रात्री रुग्णांना त्रास झाला. यामुळे हे इंजेक्शन तसेच त्यावेळी वापरण्यात आलेल्या सीरिंज व इतर वस्तू सीलबंद करून येथील फूड अ‍ॅण्ड कार्पोरेशनकडे तपासणीसाठी मुंबईला पाठविल्याची माहिती कुडाळचे वैद्यकीय अधिकारी पी. डी. वजराटकर यांनी दिली.