शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हापूसच्या आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव

By admin | Updated: February 9, 2015 01:21 IST

संमिश्र हवामान : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

रत्नागिरी : उष्णता, थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे आंबा पिकावर परिणाम झालेला दिसून येत आहे. आंबा पिकावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रियेलाही विलंब झाला. एप्रिलपर्यंत जो आंबा बाजारात येईल, अशी अपेक्षा होती, तोच आंबा गळून पडला आहे. गेल्या आठवड्यापासून थंडी अचानक कमी झाली आहे. शिवाय उकाडा वाढला आहे. त्यामुळे सुपारी ते अंड्याच्या आकाराएवढी झालेली फळे गळून पडली आहेत. शेतकऱ्यांकडून फळांच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. मात्र, नैसर्गिक प्रकोपामुळे संबंधित खर्च वाया जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक फळांची गळ झालेली दिसून येत आहे.सध्या सर्वत्र थ्रीप्सचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सध्या झाडावर जेमतेम २० ते २५ टक्के आंबा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे संबंधित आंबा थ्रीप्सपासून वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. शेवटच्या मोहोराला फळधारणा झाली असली तरी हा आंबा तयार होण्यास मे महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्याला भाव मिळणे अवघड होणार आहे. दरवर्षी विविध कारणांनी आंबापीक धोक्यात येऊ लागले आहे. नवीन सरकार स्थापन होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप आंबा - काजू मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंब्याला योग्य भाग मिळणे अपेक्षित आहे. मँगोनेट ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप संबंधित योजनेविषयी शेतकरी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे संबंधित योजना सुस्पष्ट करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महागडी औषधे फवारणी करण्याची सूचना केली जात असताना फळगळ किंवा अन्य समस्यांवर मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)