शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात समुद्र तळाची स्वच्छता, भारतातील पहिलाच प्रयोग यशस्वी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 28, 2024 13:36 IST

पर्यावरणवादी स्टालिन दयानंद यांनी स्वीकारले आव्हान : सहा स्कुबा डायव्हर्सनी ३ तासात ३०० किलो प्लास्टिक कचरा काढला बाहेर

संदीप बोडवेमालवण : वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी दयानंद स्टालिन यांनी आता सागर शक्ती या उपक्रमांतर्गत सागरतळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठीच्या पायलट प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रातून करण्यात आली. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पहिल्याच प्रयत्नात समुद्र तळाच्या एक हेक्टर परिसरातून सहा स्कुबा डायव्हर्सनी ३ तासात तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढला.

स्टालिन दयानंद म्हणाले, समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे. यातून मानवाला कॅन्सरसारख्या रोगांचा धोका आहे. वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना आम्ही मालवण येथून सुरुवात केली आहे. मालवणचा समुद्र तळ सागरी जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी समुद्री कचऱ्याची ही समस्या मोठी आहे. याचा परिणाम येथील सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी आणि पर्यटन उद्योगावर होत आहे.

कचऱ्यात काय मिळाले....१) प्लास्टिक बॉटल्स २) प्लास्टिक पिशव्या ३) खाद्य पदार्थांची वेस्टने ४) काचेच्या बॉटल्स ५) तुटलेली जाळी ६) अडकलेले सागरी जीव....यांनी राबविली मोहीमवन शक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभाग यांच्या सहकार्याने, सागर शक्ती, मालवण नगर परिषद, महाराष्ट्र वन विभाग, युथ बीट फॉर क्लायमेट, नीलक्रांती आदी संस्थांनी एकत्रित येत ही मोहीम राबविली.

सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्रासाठी प्रयत्न करणारसागरी तळाच्या स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाला आता सुरुवात झाली असली तरीही आम्ही दीर्घ काळाच्या योजनेवर काम करणार आहोत. मालवणचा समुद्र किनारा आणि समुद्राचे पाणी स्वच्छ करणे, हा आमचा संकल्प आहे. भविष्यात सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्र होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. - स्टालिन दयानंद, पर्यावरणवादी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग