शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
2
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
4
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
5
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
6
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
7
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
8
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
9
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
10
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
11
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
12
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
13
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
14
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
15
चीनची 'पॉवर परेड'! अण्वस्त्रे, समुद्री ड्रोन आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे
16
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा
17
पुतिन-जिनपिंग अन् किम यांचं अमेरिकेविरोधात षडयंत्र; चीनमधील परेड पाहून डोनाल्ड ट्रम्प संतापले
18
फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर
19
"मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल

By admin | Updated: November 20, 2014 00:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शहरी भागात १0 टक्के तर ग्रामीण भागात ५ टक्के दरे

सिंधुदुर्गनगरी : सन २०१२ मध्ये शासकीय जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल्याने पुढील वर्षासाठी शासकीय जमिनीच्या दरात वाढ करू नये, या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार शहरी भागात १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्यांचे दर वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली.शासकीय जमिनीचे बाजारमूल्य ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, कणकवली नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगररचनाकार अधिकारे आदी उपस्थित होते. २०१२ मध्ये शासकीय जमिनींचे बाजारमूल्य ठरविताना तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात दुपटीने वाढ केली होती. या निर्णयामुळे बिल्डर असोसिएशनमधून यावेळी आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाचा महसूल वाढला होता. मात्र, जमिनींचे व्यवहार कमी झाले होते. आता पुढील वर्षासाठी शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीचे बाजारमूल्य वाढवू नये, अशी मागणी बिल्डर तसेच लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आली होती. याचा सारासार विचार करून आगामी वर्षासाठी शहरी भागामध्ये १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रवीेद्रन यांनी दिली.जिल्हा नियोजन विभागाचा सन २०१५-१६चा आराखडा शासनास सादर केला आहे. हा आराखडा १२० कोटी, १५० कोटी व तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटी अशा एकूण ३ टप्प्यात पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मान्यता मिळणार आहे. तर सन २०१४-१५ साठीचे मंजूर झालेल्या १०० कोटींपैकी अजूनपर्यंत ६० कोटी रूपये जिल्हा नियोजन विभागास प्राप्त झाले असून उर्वरित ४० कोटीचा निधी हिवाळी अधिवेशनानंतर मिळणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सिंधु महोत्सवाची तयारी सुरूडिसेंबरअखेर प्रशासनामार्फत मालवणमध्ये सिंधु महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्याची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. या सिंधु महोत्सवासाठी ७० ते ८० लाख रूपये खर्च अपेक्षित असून हा खर्च जिल्हा नियोजन विभाग ३० लाख, शासनाकडून ४० लाख, यु.एन.डी.पी. १० लाख, जिल्हा परिषद १० लाख असा निधी उभा केला जाणार आहे. या सिंधु महोत्सवामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास आणखीन मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.