शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवा

By admin | Updated: February 19, 2015 23:45 IST

वैभव नाईक : सिंधु कृषी महोत्सवास प्रारंभ, २२ पर्यंत विविध कार्यक्रम

ओरोस : शेतीबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी विषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम बनवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी सिंधु कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय आयोजित सिंधु कृषी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ओरोस फाटा तर ओरोस फाटा ते शरद कृषी भवन येथे शिवज्योत आणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी गडहिंग्लजच्या लेझीम पथकाने आपल्या कलाकौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतजमिनी पडीक ठेवत आहेत. शेती सोडून नोकरीकडे त्यांचे लक्ष केंद्रीय झाले आहे. परिणामी शेतजमिनींच्या पडीक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांमध्ये शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी प्रतिष्ठान किर्लोसच्यावतीने १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कृषीविषयक प्रशिक्षणे व मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविषयक मार्गदर्शन घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करा. या शेतीतून आर्थिक उन्नती साधा व सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवा असे आवाहन केले.सुधीर सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यास आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. उत्पादन क्षमता व कृषीमालाचा दर्जा वाढविल्यावरच कृषी मालातून मिळणारे उत्पन्न वाढू शकते. तसेच बरेच शेतजमिनींचे मालक शहरात रहात असल्याने असल्या शेतजमिनी विकत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेती टिकावी, शेतकरी रहावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानने कृषी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. ज्या शेतकऱ्यांना शेती करणे शक्य नाही त्यांच्या शेतात त्यांच्याच सहभागाने कृषी प्रतिष्ठान जमिनी नांगराखाली आणेल. यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, ऊस लागवड, कृषी माल प्रक्रिया व विक्री तसेच महिला सक्षमीकरण आदींचा विशेष समावेश असणार असून यासाठीच सिंधु कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर)