शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ

By admin | Updated: April 20, 2015 00:11 IST

महावितरण कंपनी : दिवसाला लागतेय १८० मेगावॅट वीज

रत्नागिरी : गेल्या पाच वर्षात वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. शिवाय उकाडा वाढल्यामुळेही विजेच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. उकाडा वाढल्यामुळे मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७४ हजार ५९ घरगुती ग्राहक आहेत, तर ७,७२८ वाणिज्यीक, तसेच ८१६ औद्योगिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ९७० ग्राहकांकडून ६३ कोटी १५ लाख ५६ हजार ७३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी महावितरणला ४९४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वीज ग्राहकही वाढत आहेत. शिवाय महावितरणच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याला १६५ ते १७० मेगावॅट इतकी वीज लागत असे. त्यामध्ये आता वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांचा आढावा घेतला तर दरवर्षी दीड ते दोन हजार ग्राहक वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण अल्प आहे. शिवाय वसुलीही चांगली आहे. महावितरणने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक आणि आर्थिक वसुली कमी असलेल्या फिडरची वर्गवारी करून भारनियमनाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील फिडर्स अ, ब, क गटात येत असल्यामुळे भारनियमन बंद आहे.मागणी वाढल्यामुळे गतवर्षी मे महिन्यात काही ठराविक तासांसाठी राज्यात सक्तीचे भारनियमन करण्यात आले होते. राज्यात सक्तीचे भारनियमन राबविण्यात येते, त्यावेळी जिल्ह्याला त्याचा फटका बसत असला तरी सध्या जिल्ह्यात भारनियमन मात्र बंद आहे.परंतु रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या तसेच जिल्ह्याचा विस्तार वाढत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढत आहे. त्याचबरोबर सध्या उष्मा जास्त जाणवत असल्याने जिल्ह्यात वीजेची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)