शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ाहिल्या थ्रीडी, स्मार्ट डिजिटल शाळेचे उद्घाटन

By admin | Updated: October 17, 2016 00:11 IST

लोकसहभाग : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी प्राथमिक शाळेत साकारला उपक्रम

चौके : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडी येथे लोकसहभागातून साकारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या थ्रीडी प्रोजेक्टरयुक्त स्मार्ट डिजिटल व टॅबयुक्त शाळा उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. यामध्ये स्मार्ट डिजिटल खोलीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते, तर विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण आणि कार्यालयाचे उद्घाटन ठाण्याचे तहसीलदार विनोद गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडीचे संस्थापक अच्युत सावंत-भोसले, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी नाईक, मालवण पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, पंचायत समिती सदस्य भाग्यता वायंगणकर, काळसे सरपंच भावना मेस्त्री, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले, आंबेरी केंद्रप्रमुख छोटूराम पवार, केशव सावंत, उमेश प्रभू, काळसेचे उपसरपंच चंद्रकांत दळवी, विषयतज्ज्ञ गौरी नार्वेकर, काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष अर्चना प्रभू, शिवाजी विद्यामंदिर काळसेचे मुख्याध्यापक किशोर वालावलकर, काळसे बागवाडी सेवा मंडळ मुंबईच्या अध्यक्ष सदानंद केळजी, माजी विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष भाऊ नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्या दीपिका म्हापणकर, अखिल भारतीय शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, माजी सभापती राजेंद्र परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिनल कोरगांवकर, काळसे बागवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल परुळेकर, गावातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. पहिली थ्रीडी प्रोजेक्टरयुक्त स्मार्ट डिजिटल आणि विना दप्तर, टॅबयुक्त शाळेचा बहुमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे बागवाडी शाळेने मिळविला. यात स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. शाळा डिजिटल करण्याचे ठरल्यानंतर ग्रामस्थांनी विलक्षण प्रेरणेने लोकवर्गणीतून ३ लाख रुपये उभे करून शाळेला हा मान मिळवून दिला. आजपासून आपल्याला शाळेत दप्तर घेऊन जायला नको याचा आनंद आणि अभिमान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी काळसे गावचे भूमिपुत्र आणि ठाण्याचे तहसीलदार विनोद गोसावी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गावचा विकास होत असताना लोकसहभागातून अशाप्रकारे राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक वाटते. शासनाच्या धोरणानुसार भविष्यात कमी पटसंख्येच्या शाळांचे एकाच शाळेत विलीनीकरण करताना अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा पुरविणाऱ्या शाळांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांचे सहकार्य मोलाचे ठरेल. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने थ्रीडी डिजिटल शाळेच्या उद्घाटनाचे अतिशय चांगले कार्य माझ्या हातून घडले आहे. अशा प्रकारच्या डिजिटल शाळांमुळे ग्रामीण भागातील मुले शहरी भागातील मुलांशी स्पर्धा करताना कमी पडणार नाहीत हा डिजिटल शाळेचा उपयोग आहे. विद्यार्थ्यांना सुशिक्षित बनविताना त्यांना सुसंस्कृत बनविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी सर्व मान्यवर, जमीनदाते उमेश प्रभू आणि डिजिटल शाळा उपक्रमासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका शीतल परुळेकर, सूत्रसंचालन श्वेता यादव यांनी केले. आभार गौरी नार्वेकर यांनी मानले. (वार्ताहर)