शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशोच्छुक द्विधावस्थेत!

By admin | Updated: December 23, 2015 22:51 IST

पक्षांतराचे डोहाळे : सेना-भाजपात रस्सीखेच

नाशिक : डुबत्या जहाजावरून शिडात हवा भरलेल्या जहाजात उड्या मारण्याच्या तयारीत असलेल्या विविध पक्षांतील नगरसेवकांना पक्षांतराचे डोहाळे लागले असले तरी नव्या घरी नांदण्यास ओसरीही मिळेल, याची खात्री नसल्याने प्रवेशोच्छुक द्विधावस्थेत आहेत. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या सेना-भाजपामध्ये प्रवेश करण्यास महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस, अपक्ष गटातील काही नगरसेवक इच्छुक असल्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच अधिकाधिक संख्याबळ ओढण्यात सेना-भाजपातही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. येत्या रविवारी (दि.२७) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस व अपक्ष गटातील काही नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षांतर सोहळ्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून प्रवेशोच्छुक संशयितांना स्थायी समितीवर सदस्यत्वासह प्रभाग सभापतींचे गाजर दाखवितानाच पुढील वर्षी विकासकामांमध्ये झुकते माप देण्याचीही तयारी दाखविली जात आहे.

 

सर्वांना दरवाजे खुलेभाजपाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास वाढतो आहे त्यामुळे अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. सर्वांना दरवाजे खुले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ हा भाजपाचा मंत्र असल्याने पक्षात काम करणार्‍यांना भरपूर वाव आहे. भाजपात व्यक्तिकेंद्रित राजकारण चालत नाही. येत्या रविवारी होणार्‍या मेळाव्यात प्रवेशोच्छुकांची संख्या दिसून येईल. - लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजपाआयाराम-गयारामांना प्रवेश नाहीअनेक नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. नव्या वर्षात जानेवारीत शिवसेनेचा धमाका पाहायला मिळेल. मात्र, सेनेत कुणीही येईल अशा आयाराम-गयारामांना प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित प्रवेशोच्छुक किती सक्षम आहेत, त्याला जनाधार किती आहे, याची पडताळणी करूनच पक्षात प्रवेश दिला जाईल आणि त्याला योग्य तो सन्मानही दिला जाईल. सध्या काही पक्षात स्वत:ला प्रस्थापित करू पाहणारे आणि ज्यांचे अस्तित्वच नाही, अशा नेत्यांच्या भरवशावर जाणार्‍यांचा भ्रमनिरास होईल. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना