शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील कार्यपध्दती सुधारा

By admin | Updated: July 3, 2016 23:08 IST

विनायक राऊत यांच्या सूचना : मंत्री, आरोग्य संचालकांचे लक्ष वेधणार

ओरोस : जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना रुग्णसेवा देण्यापेक्षा मोबाईलचा गैरवापर वाढला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी सक्त ताकीद खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांना दिली. तसेच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली असता विविध समस्या दिसून आल्या. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत व आरोग्य संचालकांचे लक्ष वेधणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गत तीन महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात गोवा येथील सुधीर शिंदे नावाच्या रुग्णाने डिसचार्जनंतर रुग्णालयातील या रुग्णसेवेच्या दूरवस्थेबाबतची तक्रार खासदार विनायक राऊत यांच्याकडे ३० जूनला केली आहे. त्या अनुषंगाने खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट देत जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची पाहणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, छोटू पारकर, नागेंद्र परब उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात मिळणारे भोजन हे दर्जाहीन आहे. रुग्णालयात साफसफाई योग्यप्रकारे केली जात नाही. येथील कर्मचारी रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी कमी पडत आहेत. दरम्यान, रुग्णसेवा देण्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त रुची दाखवितात. यासारख्या विविध तक्रारींचे निवेदन गोवा येथील सुधीर शिंदे यांनी आपल्याला दिले होते. या निवेदनातील तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याने आपण आज या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिल्याचे खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची पाहणी केल्यानंतर हे जेवण समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ८० रुपयात दिवसभरात जेवण, नाश्ता, चहा योग्य प्रमाणात पुरविणे शक्य नाही हे मान्य करत तसेच रुग्णाला चांगल्या प्रतीचे जेवण मिळावे यासाठी जेवणाचा भत्ता वाढवून देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना सूचित करणार असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयाने एका सुदृढ व्यक्तीला एचआयव्ही बाधित प्रमाणपत्र दिले होते. याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत हल्लाबोल केला होता. या प्रकरणाची माहितीही राऊत यांनी घेतली. हे प्रकरण गंभीर असल्याने याची संपूर्ण चौकशी करावी. प्रसंगी सीआयडीची मदत घ्यावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत दोषींवर कारवाई करावी अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या पाहणीत मस्टरवर सह्या असलेले काही कर्मचारी गायब असल्याचे आढळून आले तर काहींच्या सह्याच उशिरापर्यंत झाल्या नसल्याचे दिसून आले. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत याबाबत संबंधितांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.(वार्ताहर) आॅपरेशन थिएटरमध्ये गळती सुरु ४दरम्यान यावेळी आॅपरेशन थिएटरची पाहणी केली असता यामध्ये गळती असल्याने रुग्णांना सुविधा देणे अशक्य होत आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असूनही केवळ गळतीमुळे रुग्णांना सुविधा देता येत नसल्याने ती सुधारावीत अशी मागणी करण्यात येणार आहे. औषधांचा पुरवठा अनियमित ४जिल्हा रुग्णालयात औषध विभागालाही मार्चपासून औषधांचा वेळेवर पुरवठाच होत नसल्याचे आढळून आले. केंद्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तसेच सद्यस्थितीत रुग्णालयाचा औषध विभाग जिल्हा नियोजनाच्या आॅक्सिजनवर सुरु असल्याची टिप्पणी जोडली.