शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

पडद्यामागील कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग

By admin | Updated: December 29, 2014 00:06 IST

गिरीश ओक : कुडाळमध्ये रंगला गप्पाटप्पा कार्यक्रम

कुडाळ : मालिका, सिनेमामध्ये आम्ही कलावंत मंडळी तुम्हाला दिसतो. त्यापाठीमागे कलादिग्दर्शक, कॅमेरामन, लेखक, निर्मिती सूत्रधार, स्पॉटमन यासारख्या अनेक व्यक्ती पडद्यामागून कार्यरत असतात, त्यांचेही तेवढेच योगदान निर्मितीमध्ये असते, असे उद्गार ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात काढले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे, कलादिग्दर्शक श्रीरंग भोसले, लेखक सचिन दरेकर, कॅमेरामन अशोक पवार, निर्मिती सूत्रधार विनोद नाईक, विवेक मथुरे उपस्थित होते. आमच्यासारखे अभिनेते रंगभूमीने वाव दिल्यामुळे लोकप्रिय होतात. या पाठीमागे अनेक व्यक्ती असतात. पण ते प्रेक्षकांना दिसत नाहीत. त्यामध्ये कलादिग्दर्शक, कॅमेरामन, लेखक, निर्मिती सूत्रधार आदी व्यक्तीही कलावंतच असतात. फरक एवढाच की, आम्ही प्रेक्षकांना दिसणारे आणि ते न दिसणारे कलावंत हे समजण्यासाठी आजचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये डॉ. गिरीश ओक यांची प्रकट मुलाखत झाली. डॉ. ओक म्हणाले, टेलिव्हिजनवर दिसणारं सगळं मायावी असतं. टेलिव्हिजनवरील प्रेमाच्या कथा खऱ्या समजू नका, असे आवाहन केले. झेंडा चित्रपटाचे लेखक सचिन दरेकर म्हणाले, लेखकांना प्रेक्षकांना आवडणारेच लिखाण करावे लागते. कधी वास्तव तर, कधी न आवडणारे लिहावे लागते. जाहिरातदार, पे्रक्षक व मालिकेमध्ये काम करणारे कलाकार या सर्वांना सांभाळावे लागते. यावेळी नर्सिंग अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी वर्षा तुळसकर हिने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शीर्षक गीत गायिले. यावेळी कलादिग्दर्शक श्रीरंग भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. विवेक माथुरे यांनी ‘चलते चलते’ गीत गाऊन सांगता केली. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बी. एड.चे प्राचार्य डॉ. दीपाली काजरेकर, डी. एड्.चे प्राचार्य सरोज दाभोलकर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य रमेश माळी, रुपाली नार्वेकर, जे. व्ही. परब, अनुष्का रेवंडकर, योगिता शिरसाट, परेश धावडे, नितीन बांबार्डेकर, क्रांती मयेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ सेंट्रल स्कूलच्या शिक्षिका पौर्णिमा दाभोलकर यांनी ईशस्वतनाने केला. सूत्रसंचालन नर्सिंग शिक्षिका प्रणाली मयेकर यांनी तर तेजस्विनी माजगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)