शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गामातेच्या मूर्तींचे विसर्जन

By admin | Updated: October 24, 2015 00:45 IST

कणकवलीत भक्तीमय वातावरण : ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ठिकठिकाणी श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांमध्ये श्री दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा पारंपरिक पद्धतीने केली जाते. प्रत्येक ठिकाणी परंपरेप्रमाणे यात बदल दिसून येतो. मात्र सर्वसाधारणत: नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीचि, पुढील तीन दिवस रजोगुण वाढविण्यासाठी महालक्ष्मीची तर शेवटचे तीन दिवस सत्वगुणी महासरस्वतीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर श्री दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.कणकवली शहरात राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, बाजारपेठ मित्र मंडळ, गोंधळी समाज बांधव यांच्यासह आणखीन काही मंडळांनी श्री दुर्गा देवीची विधिवत प्रतिष्ठापना केली होती. तर काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना न करता दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. कलमठ महाजनीनगर येथील वृंदावन सभागृहात गुजराथी पाटीदार समाजाने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला. (वार्ताहर)नवरात्रोत्सवाची सांगता : पोलीस बंदोबस्तजिल्ह्यात नवरात्रोत्सवाची धूम गेले नऊ दिवस सुरु होती. विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. श्री दुर्गा देवीच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर या उत्सवाची सांगता झाली. विसर्जन मिरवणुकीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. जानवली तसेच गडनदीवरील गणपती सान्यावर मूर्ती विसर्जन करण्यात आले.