शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

ओरोस परिसरात साग, कांदळवन झाडांची अवैध तोड

By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST

वनविभागाची कारवाई : राजरोस तोड; ११४ नगांचा ढीग आढळला; बाजारभावाने १० लाख किंमत

ओरोस : ओरोस डोंगरेवाडी, वर्दे कुंभारवाडी येथील नदीपात्रात कांदळवन व साग या झाडांची राजरोस तोड झाली असून, लाकडाच्या ११४ नगांचा ढीग आढळून आला आहे. शासकीय दराने त्याची एक ते दोन लाख रुपये किंमत असून, बाजारभावानुसार त्यांची ९ ते १० लाख रुपये किंमत आहे. या झाडांची बेकायदेशीरपणे तोड झाल्याचे उघड झाले आहे. वनविभागाने ही कारवाई गुरुवारी केली. कुडाळ तालुक्यातील ओरोस डोंगरेवाडी व वर्दे कुंभारवाडी येथे रस्त्यापासून काही अंतरावर पांढरा ऐन, साग आणि कांदळवन यासह मोठ्या प्रमाणात ६३ नगांची तोड झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रानजीक ५१ नग तोडलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. नदीपात्रातील वाळू उत्खननावर बंदी आहे. परंतु, नदीपात्रानजीक राजरोसपणे झाडांची विनापरवाना तोड होत असताना आणि हाकेच्या अंतरावर कडावल वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोठे कार्यालय असून, या झाडांबाबत हे कर्मचारी डोळेझाक करीत आहेत. मात्र, काही ग्रामस्थांनी कुडाळ शिवसेना शाखा कार्यालयात जाऊन सुनील राऊळ, नितीन सावंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने येथील शिवसैनिकांनी अचानक धाड टाकून वनविभागाची विनापरवाना झालेली तोड कडावल वन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. या मालाची पंच यादी घालून वन कर्मचारी, अधिकारी यांनी माल जप्त केला आहे. दरम्यान, राजरोसपणे जंगली झाडे व अन्य झाडे तोडून नेत असल्याचा आरोप शिवसैनिक सुनील राऊळ यांनी केला आहे. वनविभागाच्या कारवाईत कडावल वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे, वनपाल एस. बी. जाधव, सी. के. राऊळ, एस. जी. फर्नांडिस यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ही झाडे कोणाच्या मालकीची आहेत याबाबत चौकशी करण्यात येत आहे.