शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात केरळीयनांच्या बेकायदेशीर इमारती

By admin | Updated: May 19, 2015 00:27 IST

जंगलतोड सुरूच : मनसेने घेतली प्रांताधिकाऱ्यांची भेट; कारवाईची मागणी

सावंतवाडी : दोडामार्ग येथे वनक्षेत्रात केरळीयन व इतर लोकांनी अतिक्रमण करून जंगलतोड करून इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या सर्वावर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव व वनक्षेत्रपाल बी. एस. शिंदे यांना दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध मागण्यांसंदर्भात येथील प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मनसे कोकण संघटक अध्यक्ष परशुराम उपरकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, दोडामार्ग वनक्षेत्रपाल बी. एस. शिंदे, उपविभागीय अभियंता एम. आर. चिटणीस, मनसे तालुका उपाध्यक्ष गुरुदास गवंडे, जनहित जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेया देसाई आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर वृक्षतोड करण्यात येत आहे. वृक्षतोड पकडून गाडी दिली, तरी अधिकारी गाडी सोडतात, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी इनामदार यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यात होत असलेले अतिक्रमण यावर कडक कारवाई होईल, असे आश्वासन देण्यात आले. मणेरी येथून पाणी उपसा करून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी घालण्यात आलेली पाईपलाईन १५ मे रोजी फुटून पाणी घरांमध्ये जाऊन नुकसान झालेल्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश तहसीलदार संतोष जाधव यांना देण्यात आले. या पाण्यापासून झालेल्या नुकसान भरपाई देण्यात येईल, असे यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील आजपर्यंत केलेल्या रस्ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. शिवाय कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे यांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शविल्याने त्यांना नोटीस काढण्यात येईल, असे प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले. (वार्ताहर)मणेरीत जंगलात हॉटेलमणेरी येथील धनगर वस्तीजवळ जंगलात हॉटेल उभारण्यात आले आहे. याठिकाणी रात्री १० वाजल्यानंतर ३० ते ४० गाड्या हॉटेलकडे येत असतात. रात्री उशिरा याठिकाणी रेव पार्टीचे आयोजन केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासंदर्भात गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी उपरकर यांनी केली. याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकारी इनामदार यांनी दिले.