शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

तळवणेतील पांडवकालीन तळीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST

पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाची : स्वच्छतेची आवश्यकता, निसर्गसौंदर्याचा आविष्कार

सुनील गोवेकर - आरोंदा -निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला असतानाही पर्यटनदृष्ट्या पूर्णपणे विकसित झालेला नाही. किंबहुना पर्यटन स्थळांच्या विकसित करण्याकडे दुर्लक्षच केला जात असल्याचे दिसून येत आहे. तळवणे येथील बटकीची तळी हे स्थळ त्यातीलच एक आहे. ही तळी म्हणजे निसर्गसौंदर्याचा अप्रतिम आविष्कार आहे. या ऐतिहासिक स्थळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात काही पर्यटन स्थळे अशी आहेत की, ती विकासापासून वंचित राहिलेली आहेत. सद्यस्थितीत या तळीत गाळ साचलेला असून तो उपसा करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर असणारी ही बटकीची तळी व त्यासभोवताचा असणारा परिसर हा मनोवेधक आहे. या तळीबाबत असे सांगितले जाते की, ही तळी पांडवकालीन असून पांडवांनी तळी खोदण्याचे काम एका रात्रीत केले आहे. यामागील इतिहासाचे पुरावे मिळत नसले तरी येथील ज्येष्ठांनी ही तळी पांडवकालीन असल्याचेच सांगितले आहे. त्यामुळे या तळीला महत्त्व प्राप्त होत आहे. या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांसाठी हे खास आकर्षण ठरू शकेल. मात्र, कोणताही निधी मिळत नसल्याने ही तळी दुर्लक्षित राहिली आहे. तसेच इतरही साफसफाई करण्याची गरज आहे. या बटकीच्या तळीजवळ असणारे पांडवकालीन गोरक्ष गोठणदेव मंदिर हेही या परिसराचे निसर्गसौंदर्य वाढविते. हे मंदिर गाव पंचायतनापासून अलिप्त असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मंदिराची देखभाल केली जाते. या ठिकाणी वार्षिक पूजा करण्याची परंपरा असून ग्रामस्थांची या देवस्थानावर फार मोठी श्रध्दा आहे. पांडवकालीन असलेली ही बटकीची तळी आणि त्याच्या अवतीभवतीचा हा सारा निसर्गाने बहरलेला परिसर हा पर्यटकांसाठी भुरळ घालणारा आहे. देशी विदेशी पर्यटकांसाठी हे स्थळ नक्कीच आकर्षणाचे ठरु शकते. मात्र, त्यासाठी या स्थळाच्या स्वच्छतेसह देखभाल दुरुस्तीचीही आवश्यकता आहे. या पसिसराकडे होणारे दुर्लक्ष पर्यटनदृष्ट्या मारक ठरत आहे. या परिसरातील पर्यटन स्थळ सर्वांच्या दृष्टीपथास आल्यास यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे हा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह इतिहासप्रेमींकडूनहीहोत आहे.