शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अहवाल नसल्यास बडगा

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

भडकंबा ग्रामपंचायत : रवींद्र वायकर यांची ताकीद

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून ४ सदस्यांनी राजीनामा दिला. तंटामुक्ती पुरस्काराचा गैरवापर करण्यात आला. गावातील मुस्लिमवाडी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाले. व्यायामशाळा नसताना खोटी इमारत दाखवून २ लाखांचे साहित्यच २ वर्षात आणलेले नाही, अशी तक्रार तेथील शंकर लाड यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात केली. त्यामुळे खळबळ माजली. येत्या ७ दिवसांत याबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांनी न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, अशी तंबी रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. सोमवारी वायकर यांनी येथील अल्पबचत सभागृहात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात अत्यंत कुशलतेने २९ तक्रारींचा निपटारा केला. रस्ते, साकव, बिल्डर्सशी संबंधित विषयांवर यामध्ये विशेषत्त्वाने चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे उपस्थित होते. खेडशी येथील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत व बिल्डरने केलेले निकृष्ट बांधकाम, सातबारावर नावे दाखल करणे, स्मारक उभारणे, शेतकरी विमा अपघात, शिरगाव शेट्येवाडी खारभूमी योजना, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, खेडशीत बिल्डरने अवैधरित्या घातलेला गडगा, चिंचखरी वाडी वेसुर्लेतील ५५० ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न, कोळंबे संतनगर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न, सुरेंद्र घुडे यांच्या निवृत्ती वेतनाची निश्चिती, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मिरजोळे पाटीलवाडीतील जलवाहिनी खोलवर टाकणे, नागरी संरक्षण कार्यालय रत्नागिरीत सुरू होऊन नियुक्ती मिळणे, टॅँकरने दिवसाआड पाणी देऊन पाण्याची गैरसोय करणाऱ्या बिल्डरवर कारवाई यांसारख्या विषयांवर पालकमंत्री वायकर यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून या समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. काळबादेवी येथील पांडुरंग पेडणेकर यांच्या वडिलोपार्जित घराची घरपट्टी ग्रामपंचायतीने २००५ पासून बंद केली. ग्रामपंचायतीने आपणास न सांगता ठराव करून आपला घराचा हक्क काढून घेतला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. या जनता दरबारात हर्षल पटवर्धन, प्रभाकर कदम, सुरेंद्र घुडे, उदय गमरे, दत्तात्रय गावखडकर, विलास काळे, स्वाती पड्याळ यांच्यातर्फे उदय देसाई, प्रकाश शेट्ये, अनिल जाधव, सुमित भातडे, तुषार भोजे, प्रवीण सावंत, युवराज पाटील, सुनील साळुंखे, चंद्रशेखर डिचोलकर, युसुफ मुकादम, मनोजकुमार सावंत, शबनम झारी यांनी जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)भाट्येतील ‘ती’ जागाही ताब्यात घ्यावीभाट्येतील सर्व्हे नंबर १०१ मधील कृषक कामाच्या जमिनीच्या गैरवापराप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देऊनही त्यानंतरच्या दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी न झाल्याने संबंधितांनी बेकायदा बांधकाम हटवण्यास स्थगिती घेतली. या प्रकरणाचा फेरतपास झाला पाहिजे. याप्रकरणी योग्य तपास केला जावा, उर्वरित ८० गुंठे जागा शासनाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांनी केली. याबाबत वायकर यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.