शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी जमीन दिली तर सी वर्ल्ड होईल

By admin | Updated: December 14, 2014 23:47 IST

दीपक केसरकर : मालवण तालुका दौऱ्यात माहिती

मालवण : वायंगणी-तोंडवळी येथे होऊ घातलेल्या सी वर्ल्डबाबत या भागाचे खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांची मते जाणून घेतली असून खासदारांशी चर्चा करूनच आपण याबाबत भूमिका स्पष्ट करू असे सावध वक्तव्य राज्याचे ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. हे वक्तव्य करतानाच त्यांनी वायंगणी-तोंडवळी गावातील ग्रामस्थ सी वर्ल्डसाठी जमीन देण्यास तयार असतील तर त्याठिकाणी सी वर्ल्ड होईल अन्यथा सी वर्ल्ड दुसरीकडे होईल हे सांगण्यास केसरकर विसरले नाहीत.रविवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या राज्याचे ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, सीआझेडबाबत स्थानिकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. त्या केंद्र सरकारच्या नियमानुसारच असून त्यानुसारच आपणाला वागावे लागेल. मात्र गोव्यात ज्याप्रमाणे किनारपट्टीतील बांधकामांना तात्पुरते संरक्षण दिले गेले आहे तशा प्रकारचे धोरण याठिकाणी राबविणे शक्य आहे. सीआरझेडबाबत किनारपट्टीवरील घरांची डागडुजी करण्यास मुभा दिली आहे. हा एक मच्छिमारांना दिलासा आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी निवास न्याहारी योजनेचा लाभ घेऊन पर्यटन व्यवसाय करावा. निवास न्याहारी योजनेचे परवाने काढले नसतील तर ते काढून घ्यावेत. पर्यटन खात्याच्या सचिवांशी चर्चा करून त्या परवान्यांबाबत सुलभ अशी व्यवस्था करून देऊ. त्यामुळे मच्छिमारांनी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी निवास न्याहारी योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत असेही केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)