शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाणीटंचाईवर आदर्श मॉडेल

By admin | Updated: May 20, 2016 00:02 IST

कुडाळवासीयांचा उपक्रम : लोकसहभागातून भंगसाळ नदीतील गाळ उपसा

रजनीकांत कदम --कुडाळ --कुडाळ भंगसाळ नदीच्या पात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्यासाठी कुडाळातील सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन लोकसहभागातून युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम केल्याने मे महिन्यातही भंगसाळ नदीत लाखो लिटर पाणी जमा झाले आहे. येथील नदी गाळमुक्त करून पाण्याची पातळी वाढण्यासाठी व नदी स्वच्छ करण्यासाठी कुडाळकरांनी संघटित होऊन सुरू केलेला हा उपक्रम म्हणजे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक प्रकारचे मॉडेल उपक्रम आहे व असे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात राबविल्यास पाणीटंचाई निश्चितच दूर होईल यात तिळमात्र शंका नाही. कुडाळ भंगसाळ नदीपात्रातील गाळ गेली अनेक वर्षे न काढल्यामुळे येथील नदीच्या पात्रात गाळाचे छोटे मोठे डोंगर तयार झाले आहेत. यामुळे येथील नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात प्रत्येकवर्षी घटत आहे. येथील नदीपात्रातील गाळ काढून नदीतील पाण्याची पातळी वाढेल व कुडाळ शहराबरोबरच अन्य आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा होईल, तसेच नदीही स्वच्छ होईल. या उद्देशाने कुडाळ येथील सामाजिक संघटनांनी एकत्र येत येथील नदीपात्रातील गाळ महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून काढण्यासाठी लोकसहभागातून पुढाकार घेतला.या गाळ काढण्याच्या उपक्रमामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कुडाळ येथील रोटरी क्लब, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, लायन्स क्लब, बार असोसिएशन, ध्येय प्रतिष्ठान, डॉक्टर मेडिकल, इंडियन मेडिकल असोसिएशन, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, कुडाळ तालुका व्यापारी संघटना, कुडाळ तालुका पत्रकार समिती, डंपर चालक मालक संघटना तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या गाळ काढण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते दि. ११ मे रोजी झाला. या शुभारंभानंतर गेले आठ दिवस कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्याचे काम सर्वजणांनी संघटित होऊन युध्दपातळीवर सुरू केले आहे.शासनाचा एक रुपयाचाही निधी नाहीनदीपात्रातील गाळ काढण्यासाठी व नदी सुस्थितीत राखण्यासाठी खरेतर शासनाने विविध योजना राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून येथील पाणीटंचाईवर मात करता येईल. मात्र, कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ हा शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून लोकसहभागामार्फत काढला जात आहे. मात्र, यासाठी शासनाकडून एक रुपयाचाही निधी दिला गेला नाही. संजय भोगटे यांनी केले होते आंदोलन१गेली अनेक वर्षे कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ न काढल्यामुळे भंगसाळ नदीतील पाण्याची पातळी घटत आहे तसेच नदीचे पात्र बदलल्यामुळे नदी किनाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनींचीही मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. २येथील गाळ काढण्यात यावा व जर का शासनाला जमत नसेल तर तो लोकसहभागातून काढू, अशी भूमिका कुडाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी घेतली. आतापर्यंत आंदोलने व बेमुदत उपोषण करून वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांना गाळ काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.लोकप्रतिनिधींकडूनही कौतुकया उपक्रमाला शासनाने मंजुरी दिली आहे. सर्व सामाजिक संघटना, कुडाळातील लोकांबरोबरच सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला असून खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे व आमदार वैभव नाईक यांनीही या उपक्रमस्थळी भेट देत या उपक्रमाचे व उपक्रम राबविणाऱ्यांचे कौतुक केले आहे.संघटितपणाचा वेगळा आदर्श कुडाळ भंगसाळ नदीतील गाळ काढण्यासाठी कुडाळातील सर्व सामाजिक संघटना व लोक एकत्र येऊन हा उपक्रम राबवीत आहेत हा उपक्रम म्हणजे भविष्यात जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकण व राज्यासाठी संघटितपणाचा एक वेगळा आदर्श असल्याचे हे एक उदाहरण आहे.