शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

By admin | Updated: July 17, 2017 00:01 IST

मी तर गोरगरिबांचा कॅप्टन : केसरकर

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नसून, गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. त्यामुळे माझ्यावर नाहक टीका करण्यापेक्षा आम्ही केलेल्या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून आशीर्वाद द्या, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २७०० कोटींचा निधी आणल्याचा दावा केला.मंत्री केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गचा विकास हा झपाट्याने होत आहे. मी विकासाचे अनेक प्रकल्प घेऊन येत आहे. या कामाची लवकरच निविदा प्रकियाही होणार आहे; पण सर्व काही मी केले असे म्हणत नाही. मी व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चांदा ते बांदा योजना राज्यात राबवीत आहोत. या योजनेत चंद्रपूर व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचे श्रेय मला घेण्याची गरज नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास सर्वांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस नेते नारायण राणे यांनी माझ्यावर पहिली बालवाडी उभारा अशी टीका केली होती; पण माझ्या काळात जिल्हा परिषदेला ७० ते ८० कोटींचा निधी दिला आहे. हे सर्व पैसे पडून आहेत. त्याचा राणे यांनी अभ्यास करावा. त्यात किती बालवाड्या होतील हे बघावे, असे सांगितले. आतापर्यंत आपण मोठमोठी महाविद्यालये उभारली आणि इतरांना बालवाडीची स्वप्ने दाखविता. तुमची महाविद्यालये ही खासगी आहेत. तेथे सर्वसामान्य माणसांना प्रवेश घेताना लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळेच मी शासकीय महाविद्यालय जिल्ह्यात यावे अशी मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले. राणे यांनी अजून दहा खासगी महाविद्यालये उभारली तरी मी त्यांचे स्वागतच करेन, असे सांगत जिल्ह्यातील पहिले स्पर्धा परीक्षा सेंटर लवकरच सावंतवाडी येथे सुरू होणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी जाहीर केले.आमदार नीतेश राणे यांनी मला अवैध मच्छिमारांचा कॅप्टन असे म्हटले आहे; पण मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नाही, तर गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. ज्यांनी मच्छिमारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही, ते वाद उभा करीत आहेत. पण त्यांनी वाद उभा करताना मला यात नाहक ओढू नये. माझी भूमिका ही नेहमी परराज्यांतील मच्छिमारांच्या विरोधातील आहे. कर्नाटक व गोवा येथील ट्रॉलर्स आपल्या समुद्रात येऊन मच्छिमारी करतात. याविरोधात गस्ती नौका, अतिरिक्त पोलीस बळ हे मी स्वत: उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परराज्यांतील येणारे ट्रॉलर्स बंद झाले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मच्छिमारांना डिझेल तसेच भविष्यात जिल्ह्यातील ८०० बोटींना इंजिन देण्यात येणार आहे. मच्छिमारांचे प्रश्न आम्ही सोडविले. एवढी वर्षे राणे यांनी हे प्रश्न का सोडविले नाहीत? त्यांना सर्वसामान्यांविषयी आस्था नाही. ते फक्त राजकारण करतात, असा टोलाही त्यांनी यावेळी राणे यांना लगावला. पुढील महिन्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आम्ही आणलेल्या निधीतून विकासकामांची उद्घाटने होणार असून, या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून नारायण राणे यांनी आशीर्वाद द्यावेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २७०० कोटींचा निधी आणण्यात आला असून, काही विकासकामे निविदेच्या प्रकियेत आहेत. तर काही निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रकिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यातील १४०० कोटी रुपये फक्त रस्त्यासाठी देण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांना देण्यात आली असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.शासकीय महाविद्यालये मागण्यात गैर काय ? काँग्रेस नेते नारायण राणे हे स्वत: महाविद्यालये उभारतात आणि दुसऱ्यांना मात्र बालवाडीची स्वप्ने दाखवितात. येथील गोरगरीब जनतेला खासगी महाविद्यालयाची फी झेपणार नाही, म्हणूनच आम्ही शासकीय महाविद्यालयाची मागणी केली आहे. त्यात गैर काय, असा सवाल करीत राणे यांच्याकडे नियोजन नसल्यानेच त्यांच्या सर्व योजना फसत गेल्या. त्यात ‘उत्तम स्टील’चाही समावेश करावा लागेल, असेही मंत्री केसरकर म्हणाले.