शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अतिप्रसंग; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : नवºयाला व तुला ठार मारू अशी धमकी देत विवाहित महिलेवर तिघा युवकांनी वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे घडली. याबाबत त्या पीडित महिलेने बांदा पोलिसांत मंगळवारी तक्रार दिली. या प्रकरणातील संशयित तीन युवकांपैकी निखिल ऊर्फ मोहन शंकर आरोसकर (वय २२) व साईनाथ बाबा धुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : नवºयाला व तुला ठार मारू अशी धमकी देत विवाहित महिलेवर तिघा युवकांनी वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे घडली. याबाबत त्या पीडित महिलेने बांदा पोलिसांत मंगळवारी तक्रार दिली. या प्रकरणातील संशयित तीन युवकांपैकी निखिल ऊर्फ मोहन शंकर आरोसकर (वय २२) व साईनाथ बाबा धुरी (३२, दोघेही रा. शेटकरवाडी) या दोघांना बांदा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली. तर तिसरा संशयित गौरेश केरकर याचा शोध सुरू आहे.याबाबत बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिलेली माहिती अशी की, शेर्ले-दुकानवाडीतील या पीडित महिलेचा विवाह ११ मार्च २०१६ रोजी झाला होता. यानंतर तिच्या नवºयाचा मित्र असलेला निखिल हा जानेवारी महिन्यात पीडित महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी आला होता. ती महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकगृहात गेली असता निखिल याने तिच्या मोबाईलवरून तिचा नंबर घेतला. त्यावरून त्याने तुला व तुझ्या नवºयाला ठार मारू अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यामुळे त्या विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली नाही. दरम्यान, निखिल याने याबाबत आपले मित्र साईनाथ व गौरेश यांना सांगत त्या महिलेचा मोबाईल क्रमांक दिला. त्यांनीही तिच्या घरी जात तुझ्यात आणि निखिल यांच्यातील संबंधाची माहिती तुझ्या नवºयाला सांगू अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला.काही दिवसांपूर्वी ती विवाहिता आपल्या माहेरी गेली असता यातील निखिल याने तिला मोबाईलवरून धमकी देत बोलावून घेत पुन्हा अतिप्रसंग केला. मात्र आपल्या पतीला व आपल्या जिवाला धोका होईल या भीतीने तिने ही गोष्ट सांगितली नाही. हा प्रकार जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत घडला. वारंवार होणाºया या त्रासामुळे ती विवाहिता मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी या तिघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली.बांदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली ही महिला प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. बांदा महिला पोलिसांनी तिला धीर देत तिची तक्रार घेतली व या प्रकरणातील तिघांपैकी दोघांना तत्काळ अटक केली. तर यातील तिसरा संशयित गौरेश हा कामाला बाहेर गेल्याने पोलिसांना आढळून आला नाही. या पीडित महिलेचा पती हा बांद्यात एका वाहनावर खासगी चालक म्हणून कामाला आहे. तर हे तिघे संशयित या महिलेच्या पतीचे मित्र असल्याचे निष्पन्न झाले.