शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पत्नीला वाचविताना पतीचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2014 00:29 IST

पत्नी बचावली : केळूस-खुंडासवाडीतील घटना

कुडाळ : विजेचा शॉक लागलेल्या पत्नीला वाचविताना केळूस-खुंडासवाडी येथील विजय खरात (वय २३) या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेत त्याची पत्नी मात्र बचावली. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. केळूस येथील विजय खरात यांच्याकडे गणपती आणण्यात आला होता. मोठ्या उत्साहात खरात कुटुंंबियांनी गणपतीचे पूजन केले. घरात आनंदाचे वातावरण होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास खरात याची पत्नी अंगणात वाळत टाकलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. मात्र, कपडे वाळत घातलेल्या तारेला अंगणात सोडलेल्या बल्बची वायर कट होऊन स्पर्श करीत असल्याने ती विद्युतभारीत झाली होती. अनावधानाने या विद्युत भारीत तारेला तिचा स्पर्श होताच शॉक बसून ती वायरला चिकटून राहिली. आपल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याचे विजयच्या लक्षात येताच त्याने तत्काळ धाव घेऊन तिला तारेपासून दूर ढकलले. मात्र, या प्रयत्नात त्याचा स्पर्श तारेला होऊन त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि तारेसहीत तो खाली कोसळला. वैद्यकीय सेवाच मिळाली नाहीशॉक लागून गंभीर जखमी झालेल्या विजयला तत्काळ उपचारांसाठी म्हापण येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टर नसल्याने परूळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथेही डॉक्टर नसल्याने विजयला कु डाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल हलविण्यात आले. मात्र, कुडाळमध्ये आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. विजयने घराच्या बाहेरील अंगणात लोखंडी मंडप घातला असून तिथे कपडे वाळत घालण्यासाठी तारा लावण्यात आल्या आहेत. याच तारेला लागून अंगणात असलेल्या लाईटची वायर तारेकडे कट होऊन तारही विद्युत भारीत झाली होती. विजय म्हापण बाजारपेठेत उसाचा गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असे. त्याच्या मृत्यूने घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेल्याने खरात कुटुंबियांचा आधारवडच हरपला आहे. विजयच्या पश्चात पत्नी, आईवडील व एक महिन्याची छोटी मुलगी तसेच दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)