शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

साळगाव परिसरातील शेकडो माड जमीनदोस्त

By admin | Updated: December 19, 2014 00:15 IST

हत्तींकडून नुकसान : शेतकरी हतबल; नुकसानग्रस्तांसाठी उपाययोजना करण्याची मागणी

माणगाव : माणगाव परिसरात हत्तींनी माड बागायती उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे. काल, बुधवारी रात्रीही साळगाव ढोलकरगाव, तांबळवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे शेकडो माड हत्तींनी उन्मळून टाकले. या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाले असून, यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.नानेली परिसरात शेतकऱ्यांच्या नुकसानीनंतर हत्तींनी साळगाव परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी साळगाव ढोलकरगाव, तांबळवाडी परिसरातील तुकाराम मळीक, सत्यवान सावंत, मधुकर सावंत, सुधाकर परब, मुकुंद परब, न्हानू दळवी, तुकाराम परब, रघुनाथ परब, विजय सावंत, धोंडिबा परब, प्रकाश केसरकर, आबा बांदेलकर, तुकाराम भिसे, कृष्णा उमळकर, गुंडू सावंत अशा पंधरा शेतकऱ्यांचे शेकडो माड जमीनदोस्त करीत एक नवा उच्चांक गाठला आहे.माणगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल आर. बी. सानप यांनी आज, गुरुवारी एका दिवसात ५७ माडांचे पंचनामे केले आहेत. हत्तींकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनाम्याकरिता आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हत्तींच्या या कळपाने माड खाण्यापेक्षा माड पाडण्याचा सपाटा लावला आहे. हत्तींकडून शेतकऱ्यांच्या माडबागायतीत घुसून माड पाडले जात आहेत.शेतकरी दहा ते वीस वर्षे माडाची जोपासना करीत असून, त्यानंतर नारळ मिळण्याच्या वेळीच हत्तींनी माड पाडून टाकल्याने लाखोंचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. नुकसानभरपाई देण्यास केंद्राचा हिरवा कंदीलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींपासून झालेल्या नुकसानीला आता केंद्राची मदत देण्यास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हिरवा कंदील दिला आहे. यासाठी येथील खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले आहेत. केंद्राकडून मदत मिळावी यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत यासंदर्भात विशेष बैठक आयोजित केली व यासंदर्भात विशेष आर्थिक मदतीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.या बैठकीला खासदार विनायक राऊत, वनविभागाचे डायरेक्टर जनरल एस. एस. गर्बीयार, प्रोजेक्ट एलिफन्टचे इन्स्पेक्टर जनरल आर. के. श्रीवास्तव यांच्यासह पर्यावरण व वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)