शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेकडो भाविक सातेरी चरणी नतमस्तक

By admin | Updated: July 19, 2014 23:51 IST

वार्षिक जत्रोत्सव : मालवण तालुक्यातील बिळवस येथील जलमंदिर

चौके : मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या बारा वाड्यांची मूळ भूमिका मानल्या जाणाऱ्या बिळवसच्या जलमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणाऱ्या, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देवी सातेरीचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव शनिवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला.निसग सौंदर्याने नटलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देवी सातेरी मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे आहे असे जाणकार सांगतात. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव एक दिवसाचा असल्याने देवीची ओटी भरण्यासाठी मसुरे व इतर गावातील शेकडो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु श्री देवी सातेरी देवालय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त यांच्या सुनियोजनामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होत होते.असा पार पडतो जत्रोत्सवबिळवसमधील प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमून आषाढातील जत्रेची तारीख ठरवितात. जत्रेदिवशी गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून हा नीळ बनवला जातो. नंतर देवीला वस्त्रालंकार, मुखवटा घालून नेसविले जाते. त्यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला प्रत्येक घरातून नैवैद्य आणला जातो. मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरितीप्रमाणे गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. यावेळी भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात व नवसफेड करतात. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने भरून जातो. सायंकाळी देवीच्या समोर ठेवलेले मडके गावकर मंडळी घेऊन वाजत गाजत गांगोची राय येथे नेतात व त्याठिकाणी वाडी करून गाऱ्हाणे घालतात. पुन्हा ते मडके मंदिराकडे घेऊन येतात. ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेला प्रसाद वेगळा करून दोन भाग देवीसमोर व एक भाग ताटात ठेवतात. त्यानंतर गाऱ्हाणे करून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात व जमलेला दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्यानंतर देवीवरील वस्त्रे, दागिने उतरवून देवीच्या पेटाऱ्यात ठेवून तो पुन्हा वाजतगाजत नेऊन मानकऱ्यांकडे पोहोचवला जातो. जत्रेदिवशी रात्री मंदिरात कुणीही थांबत नाही. भाविकांनी कुठूनही बोललेला नवस किंवा मागणे देवी सातेरी पूर्ण करतेच अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या जत्रोत्सवासाठी ओट्या, खेळणी, हॉटेल तसेच खाजाची दुकाने थाटण्यात आली होती. शेकडो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सातेरी चरणी नतमस्तक झाले. (वार्ताहर)