शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पाण्यासाठी शंभर वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 00:45 IST

राजन साळवींचे प्रयत्न : खरवते-धनगरवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

वाटूळ : मुंबई - गोवा महामार्गालगत डोंगरमाथ्यावर वसलेल्या खरवते - धनगरवाडीची पिण्याच्या पाण्याची शंभर वर्षांपासून कायम असलेली समस्या अखेर सुटली आहे. आमदार राजन साळवींच्या प्रयत्नांमुळे खरवते - धनगरवाडीत १५ जून रोजी नळपाणी योजना प्रत्यक्ष सुरु झाली आहे.मागील शंभर वर्षांपासून वाडीतील लोकांना डोंगर उतरून जंगलामध्ये असलेल्या नाल्याजवळून पाणी आणावे लागत होते. त्यासाठी पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज डोंगर उतरुन जंगलात यावे लागे. श्वापदांची भीती उराशी बाळगत पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष खरवतेतील धनगरवाडीला नित्याचा झाला होता. ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना मदतीचा हात देऊ केला.राजापूरचे आमदार साळवी यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत वाडीसाठी विहीर व नळपाणी योजना राबवण्याचे अभिवचन दिले होते. या वचनाची पूर्तता झाली असून, १५ जून रोजी विहिरीतील पाणी नळयोजनेच्या सहाय्याने धनगरवाडीमध्ये पोहोचले असून, शंभर वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. सदर योजनेच्या पाठपुराव्यासाठी धनगर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश झोरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, सरपंच आग्रे, शेखर कुलकर्णी आदींनी मेहनत घेतली. जिल्हा धनगर समाज संघटनेकडून आमदार साळवी, तहसीलदार भालेकर, प्रांताधिकारी यांचे आभार मानले आहेत. (वार्ताहर)वणवण थांबली : ग्रामीण भागात पायपीटजिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खरवते येथील लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबण्यासाठी १०० वर्षांची वाट पाहावी लागली.योजना राबवा...पाण्याची समस्या सोडवण्यासाठी योजना राबवण्यात येते. थोड्याच दिवसात ती बंद पडते. त्यामुळे कोणतीही योजना सक्षमपणे राबवणे गरजेचे आहे.