शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तरीही गणेशचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

गणेश राठोड : जातीचा दाखला न मिळाल्याने पॉलिटेक्निक प्रवेशापासून वंचित

रत्नागिरी : आई - वडील मोलमजुरी करतात. तरीही दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवणाऱ्या लमाण समाजातील गणेश मोतीराम राठोड या मुलाला केवळ अनुसूचित जातीचा दाखला न मिळाल्याने यावर्षी त्याला पॉलिटेक्निच्या प्रवेशाला मुकावे लागले. मात्र, येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने शिकण्याची जिद्द आणि त्याची हुशारी पाहून त्याला महाविद्यालयात अकरावीत प्रवेश दिला. आता बारावीनंतर त्याचे इंजिनिअरचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. अन्यथा त्याचे एक वर्ष वाया गेले असते.गणेशचे वडील मोतीराम राठोड एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतात. मूळ उस्मानाबाद येथील हे कुटुंब गेली २५ वर्षे रत्नागिरीत वास्तव्याला आहे. गणेशाचे वडील निरक्षर असल्याने त्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नाहीत. आईही घरकाम करून संसाराला हातभार लावते. तरीही त्यांनी स्वप्न बघितलीत ती आपल्या दोन्ही हुशार मुलांना शिक्षणाने उच्च पदावर न्यायचं. येथील पटवर्धन प्रशालेत शिकत असताना गणेशने यावर्षी दहावीत कुठलीही खासगी शिकवणी नसताना चक्क ८८ टक्के मार्क मिळविले. त्याची लहान बहीण रेणुका नववीत ७८ टक्के मार्क मिळवून आता दहावीत गेलीय. गणेशला इंजिनिअर होण्याची इच्छा असल्याने त्याने दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला मोतीराम यांना उस्मानाबाद येथून आणावा लागणार होता. प्रवेशाला तर केवळ चार दिवस शिल्लक होते. खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा, तर ८००० रूपये शुल्क देण्याचीही त्याची क्षमता नव्हती. त्यामुळे ८० टक्के गुण मिळवूनही गणेशला तंत्रनिकेतनला प्रवेश घेता आला नाही. गणेशने येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातही अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला होता. प्रवेशावेळी त्याने आपली अडचण महाविद्यालयाला सांगितली. त्याची शिकण्याची अतीव इच्छा होती. मात्र, त्याआड असलेली जातीच्या दाखल्याची अडचण समजून महाविद्यालयाने दाखला आणण्यासाठी त्याला काही दिवसांची मुदत दिली आणि त्याला अकरावीत प्रवेशही दिला. दरम्यान, त्याच्या वडिलांनी आपल्या गावाला जाऊन जातीचा दाखलाही मिळविला. त्यामुळे प्रवेशाचा अडसर दूर झाला. वाया जाणारे वर्ष भरून निघाले. आपल्याला इंजिनिअर व्हायचेच आहे. त्यामुळे आपण अभ्यासासाठी खूप कष्ट घेणार, असे मनोगत गणेश व्यक्त करतो. (प्रतिनिधी)