शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काथ्यामधून मिळतोय घरबसल्या रोजगार

By admin | Updated: January 17, 2017 00:40 IST

शासनामार्फत उद्योगाबाबत प्रशिक्षण : पहिल्या टप्प्यात ३६0 महिला प्रशिक्षित, टाकाऊ सोडणातून टिकाऊ वस्तू निर्मिती

रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडेसिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाची मोठी लागवड असून त्याचा वापर मर्यादितच राहिला आहे. या नारळातून निघणारे सोडण टाकाऊ म्हणूनच गणले जाते. मात्र, नारळाच्या सोडणावर आधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरातून तयार करण्यात येत असलेल्या काथ्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करून महिलांना घरबसल्या अर्थार्जन उद्योग महाराष्ट्र शासनाच्यावतीने निर्माण करण्यात आला आहे. त्यानुसार रिसोर्स बेस्ड इंटोसिव्ह प्लॅनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या पथदर्शी प्रकल्पांर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यावतीने जिल्ह्यातील महिलांना दोरी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १२ केंद्रांवर ३६० महिलांना प्रशिक्षण दिले जात असून त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन काथ्या उद्योजकता अभियान सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील प्रथम ८०० महिलांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत महिलांनी बनविलेला माल शासकीय स्तरावरूनच विकत घेतला जाणार असून कच्च्या मालाचा पुरवठा शासनच करणार आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी प्राप्त झाली आहे.शासनस्तरावरून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना इलेक्ट्रॉनिक रॅट मोफत मिळणार आहे. शासनाच्या चांदा ते बांदा या विशेष योजनेंतर्गत काथ्या उद्योग व्यवसाय जिल्ह्यात विकसित व्हावा यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे यात महत्त्वाचे योगदान आहे.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काथ्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा व नवीन काथ्या फॅक्टरीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भारत सरकार क्वॉयर बोर्डचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाच्या अनेक योजना येतात. मार्केटींग ही बाब महत्त्वाची असते. कच्चा माल पुरवठा अशा अनेक गोष्टी उद्योग व्यवसायात गरजेच्या असतात. पण ग्रामीण भागातील महिला यात अपयशी ठरतात. पण आता शासनच त्यांच्या दारी सर्व सुविधा घेऊन आल्याने एक महिला महिन्याला सुमारे ८ हजार रूपये कमावू शकते. चांदा ते बांदा योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक योजना, स्वयंरोजगाराचे आगामी उपक्रम आखले जात आहेत. पण या योजनेचे महत्त्व कळण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक कार्यालय सिंधुुदुर्ग जिल्ह्यात होणे आवश्यक आहे. काथ्या व्यवसायापासून दोरी बनविण्याचे प्रशिक्षण जिल्ह्यात सुरू आहे. या महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे शासन स्तरावरून गरजेचे आहे.