शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

नव्या नियमांमुळे विकासाबाबत आशा

By admin | Updated: November 20, 2015 00:11 IST

सीआरझेड प्रश्न : सावंतवाडी तालुक्यातील १५ गावांचा समावेश

बांदा : सीआरझेड कायद्याचा फटका सावंतवाडी तालुक्यातील खाडीपात्रालगतच्या १५ गावांना बसला आहे. यातील सर्वाधिक फटका वेगाने विकसीत होणाऱ्या बांदा शहराला बसला आहे. मात्र, आता नव्या निकषाप्रमाणे ५00 मिटरवरून हद्द १00 मिटरवर आल्याने या गावांच्या विकासाबाबत आशा निर्माण झाली आहे.सावंतवाडी तालुक्यातील बांदा, किनळे, मडुरा, नाणोस, सातार्डा, सातोसे, सावरजुवा, शेर्ले, तळवणे, तिरोडा, आजगाव, आरोंदा, भटपावणी, कास, कवठणी या गावांना बसला आहे. या गावांमधील सर्वाधिक परिसर हा या कायद्यात सापडल्याने येथील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. बांदा शहराचा समावेश हा सीआरझेड १ बी व सीआरझेड ३ मध्ये करण्यात आला आहे. शहरातील ५१६६.३२ स्क्वेअर मिटर परिसर हा सीआरझेड १ बी मध्ये तर २४१0९६.0८ स्क्वेअर मिटर परिसर हा सीआरझेड ३ मध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. इतर गावांमधील परिसराची देखिल सीआरझेडच्या कायद्यानुसार वर्गवारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)बांदा गावाला शहर म्हणून मान्यता मिळाल्याने येथील व्यापारी पेठ व बांधकामांचे वेगाने विस्तारीकरण होत आहे. सीआरझेड कायद्यामुळे खिळ बसली आहे. सीआरझेड कायद्याचा सर्वाधिक फटका हा बांदा शहराला बसला आहे. यामुळे सीआरझेडचे नियम लावताना बांद्याला शहराचे निकष लावणे गरजेचे आहे. यासाठी बांदा शहराचा समावेश सीआरझेड ३ मधून सीआरझेड २ मध्ये करावा यासाठी जास्तीत जास्त हरकती नोंदविण्यात येणार आहेत.- मंदार कल्याणकर, सरपंच बांदासीआरझेड कायद्याविषयी१९९१ साली सीआरझेड कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार शहरी व ग्रामीण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच ज्याठिकाणी नदिपात्राला गावातील अंतर्गत रस्ते हे समांतर आहेत त्याठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. गावातील परिसराप्रमाणे या गावांचे सीआइझेड १ अ‍े, सीआरझेड १ बी, सीआरझेड २, सीआरझेड ३ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. सीआरझेड १ बी मध्ये नदिपात्राला येणाऱ्या भरतीची न्यूनतम ते उच्चतम रेषा यामधील येणरा भाग, सीआरझेड २ मध्ये १00 मीटर रेषेतील ५0 टक्के भाग हा बांधकामांसाठी वापरण्यायोग्य तर सीआरझेड ३ मध्ये नदिपात्रालगतचा संपूर्ण अविकसीत भाग यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील नियम व अटी या जाचक असून यामुळे सर्वसामान्य जनता भरडली गेली आहे.