शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहिनांसाठी ‘घरकूल जागा अर्थयोजना’

By admin | Updated: April 13, 2016 23:30 IST

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना फायदा : घरकुलाच्या जागेचाही आता प्रश्न सुटणार

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत, ही बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील भूमिहिनांसाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसहाय्य योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा आवास योजना व राज्य पुरस्कृत अन्य योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत, अशा भूमिहीन बेघर कुटुंबांना घरकुल बांधकामास जागा खरेदी करण्यासाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना’ शासनाने जाहीर केली आहे. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुलपात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी ५० हजारपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी ५०० चौरस फूटपर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करता येईल. मोठ्या ग्रामपंचायती तसेच शहराशेजारील ग्रामपंचायतीमध्ये जागेचे जास्त दर व जागेची कमी उपलब्ध विचारात घेता, ५०० चौरसफुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्याच्या संमतीने दोन मजली (जी +१) किंवा तीन मजली (जी+२) इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी ५० हजार अर्थ सहाय्य देता येईल. याप्रमाणे भूमिहीन, बेघर कुटुंबांना जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती मार्फत जागा खरेदीस मान्यता देण्यात येईल. याचा लाभ घेणेसाठी लाभार्थीने जागा खरेदीबाबत खरेदीखत (रं’ी अ‍ॅ१ीीेील्ल३) सादर करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे जागा खरेदी केल्याचे खरेदीखत ग्रामसभेमध्ये अवलोकनार्थ ठेवण्यात येईल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)