शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास लाखांच्या रकमेसह कार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 00:54 IST

आरोंदा येथे कारवाई : गोव्यातील दोघांची चौकशी

सावंतवाडी : कणकवलीहून आरोंदा मार्गे गोव्याकडे ५० लाखांची कॅश घेऊन जात असताना आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावर गोव्यातील दोघा युवकांना कारसह ताब्यात घेतले आहे. त्यांची उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. ताब्यात घेतलेल्या युवकांचे नाव विजयकुमार गोपीराव शर्मा व विक्रम रामचंद्र जंजीर असे असून, त्यांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडील या रकमेबाबतचे पुरावे सादर करता आले नव्हते.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयकुमार शर्मा व विक्रम हे दोघे युवक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे आपली वसुली करून गोव्याकडे चालले होते. त्याच वेळी आरोंदा दूरक्षेत्रावर कार्यरत असलेले पोलिस हेडकाँस्टेबल झापू पवार नेहमीप्रमाणे गाड्यांची तपासणी करीत असतानाच तेथे एक कार आली.पोलिसांनी इतर कारप्रमाणे या कारचीही चौकशी केली असता एका बॅगेत मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेत सोबत असलेल्या दोघा युवकांची चौकशी केली. यावेळी या युवकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत; आम्ही व्यापारी असून, स्टीलच्या पैशाची वसुली करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या वसुलीबाबत त्यांच्याकडे कोणतीही पावती नसल्याने पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणले.येथे पोलिस उपअधीक्षक प्रवीण चिंचळकर व पोलिस निरीक्षक शंकर पाटील या दोघांनी रात्री उशिरापर्यंत या दोघा युवकांची चौकशी केली; पण त्यावेळीही या युवकांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने अखेर पोलिसांनी या युवकांना रात्री उशिरापर्यंत व्यवसायातील पैसे असल्यास तुम्ही पावत्या जमा करा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यामुळे उशिरापर्यंत या युवकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)