शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

इतिहासाबाबत एकमत होणार नाही

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

सदानंद मोरेंचे आवाहन : कणकवलीत इतिहास संशोधक मनोहर कदम स्मृती प्रबोधन महोत्सव

कणकवली : इतिहासाच्या बाबतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. तो कमी करीत नाही आणि वर्तमानातही उतरत नाही, तोपर्यंत आपली चळवळ तशीच भूतकाळात रममाण होईल. इतिहासाबाबत कधीही एकमत होणार नाही. त्यामुळे ज्यांना चळवळ करायची आहे, त्यांनी इतिहासाकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयाच्या पटांगणावर रविवारी आयोजित इतिहास संशोधक मनोहर कदम स्मृती प्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबा आढाव, माजी आमदार काँ. नरसय्या आडम, साहित्यिक राजन गवस, श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, नाटककार संजय पवार, पत्रकार सचिन परब, प्रतिमा जोशी, जीवराज सावंत, प्रा. विनोदसिंह पाटील, काँ. किशोर जाधव, मधुकर मातोंडकर, सुरेखा दळवी, महाराष्ट्र तेलगू मंच अध्यक्ष जगनबाबू गंजी, अंकुश कदम आदी उपस्थित होते. सचिन परब, प्रतिमा जोशी, जीवराज सावंत, किशोर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अंकुश कदम यांनी केले. सत्यशोधक मनोहर कदम, प्रागतिक समाज विज्ञान संशोधन संस्थेचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. तसेच मनोहर कदम स्मृती ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)डॉ. बाबा आढाव : जातियतेच्या तसेच धर्माच्या मनोऱ्यावर देश उभा राहतो आहे. याचे भान ठेऊन परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्र्त्यानी काम केले पाहिजे. परिवर्तनवाद्यांनी जनतेसमोर सांस्कृतिक पातळीवर ठोस असा कार्यक्रम ठेवला पाहिजे. तरच प्रतिगामी चळवळींना शह बसेल. भारतातील जातीयव्यवस्था, लिंगभेद सहजासहजी नष्ट होणार नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना समतेचा वृक्ष एकाएकी उगवणार नाही. माणसाला मारता येईल. मात्र, त्याच्या विचारांना मारता येणार नाही. त्यामुळे कितीही आक्रमणे झाली तरी न डगमगता समतेचा लढा सुरुच ठेवला पाहिजे. मनोहर कदम यांनी भारतीय कामगार चळवळीला एक नवा आयाम आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे कार्य श्रेष्ठ होते. मालवणी भाषेत हृदयातील भावना व्यक्त करता येतात.हे मनोहर कदम यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते. या प्रबोधन महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. तर ती खरी त्यांना आदरांजली ठरेल. नरसय्या आडाम : देशात परिवर्तन होण्यासाठी ागतसिंग, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आत्मसात करणारे तसेच जीवावर उदार होणारे लोक परिवर्तनवादी लढ्यात सहभागी झाले पाहिजेत. ९३ टक्के असंघटित कामगार असून त्यांना केवळ एक वेळचे जेवण मिळावे अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. डाव्या चळवळीतील नेते वगळले तर इतर सर्व पक्षातील नेत्यांच्या घरात काळा पैसा आहे. तो बाहेर काढला तर देशातील गोरगरीब जनतेचे सर्व प्रश्न एका झटक्यात सुटतील. सगळीकडे भ्रष्टाचा रुजला असून तो नष्ट होत नाही तोपर्यंत विधीमंडळात गरीबांसाठी लढणारे नेते जाणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी समान कार्यक्रम हाती घेऊन संघटित झाले पाहिजे. मुंबईच्या जडणघडणीत तेलगू समाजाचे असलेले योगदान संशोधनाअंती मनोहर कदम यांनी शोधून काढले. त्यावर आधारित पुस्तक लिहिले. त्यांचे हे कार्य महान आहे. ते पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.खोटा इतिहास ?डॉ. सदानंद मोरे: सध्याच्या काळात इतिहास ही एक रणभूमी झाली आहे. सर्वसमाज घटकांना मान्य असलेले शिवाजी महाराज हे एक व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जातीजमातींना मान्य होईल असे शिवचरित्र अद्याप लिहिले गेले नाही.इतिहास संशोधन जातीग्रस्त झाले आहे. दुसऱ्या जातीच्या लोकांनी जर काही चांगले केले असेल तर ते मान्य करायचे नाही. त्याचबरोबर आपल्या जातीच्या लोकांकडून काही प्रमाद घडला असल तर तो मान्य करायचा नाही. अशी स्थिती सध्या आहे. खोट्या इतिहासाचा प्रतिवाद खोट्या इतिहासाने करायचा नाही. यावर सर्वांचे एकमत झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी काही जमातींनी अन्य जमातींवर कमालीचे अन्याय केले असतील ते कोणीही नाकारत नाही. पण आज जे चालल आहे त्याकडे लक्ष द्या. वर्तमानात राहिलं तरच परिवर्तनवादी चळवळ यशस्वी होऊ शकेल, याची दखल घ्या.