शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व : सुरेश प्रभू

By admin | Updated: July 6, 2017 16:32 IST

सिंधुदुर्गात जीएसटी व मुद्रा योजना कार्यशाळेला प्रतिसाद

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0६ : जीएसटी मुळे ऐतिहासिक पर्व सुरु झाले आहे. कर प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करत सर्वसामान्य व्यापा-यापासून नागरिकांना दिलासा देत सरकारने सुविधा निर्माण केली आहे. पायाभूत सुविधांचा विकासासाठी, बेरोजगारी कमी करणे व उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या या जीएसटी करप्रणालीमुळे सर्वांचे जीवन सुसह्य होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी येथे आयोजित जीएसटी व मुद्रा योजना कार्यशाळेत व्यक्त केले. येथील नवीन नियोजन समिती सभागृहात आज जीएसटी व मुद्रा योजना संदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य आयुक्त के. पी. एस. सुरी, श्री. सुरेंद्र मानकोसकर, व्ही. एम. शेटे, के. के. श्रीवास्तव, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, आयुक्त प्रशांत साळे, रविराज जाधव, माजी आमदार सर्वश्री राजन तेली, अजित गोगटे, प्रमोद जठार व संदेश पारकर उपस्थित होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जीएसटी व मुद्रा योजनेसंदभार्तील सिंधुदुर्गची परिस्थिती आढावा घेतला यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, केंद्र सरकारने १ जुलै पासून करप्रणाली मध्ये आमुलाग्र बदल केले. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालात जीएसटीचा उगम झाला त्यानंतर युती सरकारच्या कालावधीत यावर चर्चा झाली मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला. राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वेगवेगळ्या करांमुळे सर्व सामान्य लोकांना कर भरण्यास अडचणी होत्या कर द्यायला लोक तयार होते. मात्र पध्दत चुकीची होती. म्हणूनच सर्व सामान्य माणसाची अडचण दूर करण्यासाठी प्रथमच सर्व राज्य व केंद्र सरकारनी जीएसटी कौन्सील निर्माण केले आणि या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली.भारतात अद्याप बेरोजगारीचा प्रश्न आहे. काही ठिकाणी गरीबी आहे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, उद्योग निर्माण करणे, नोकरी देण्याची क्षमता निर्माण करणे यासाठी गुंतवणुकीची आवश्यता असते. ही गुंतवणूक खासगी क्षेत्रातून केली जात नाही. त्यासाठी या जीएसटी निधीचा वापर केला जाणार आहे. सरकारचे उत्पन्न व त्यांची खर्च करण्याची क्षमता यामध्ये तफावत असल्याने या करामधून जे पैसे मिळणार त्यातून विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील नागरिक हे प्रामाणिकपणे टॅक्स देणारे आहेत. येथे उद्योजकता निर्माण करण्यासाठी जीएसटीची आवश्यकता आहे. टॅक्स भरण्याचे सामाजिक व राजकीय वातावरण देशात नव्हते मात्र आता जीएसटी संदर्भात ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रभू यांनी यावेळी जिल्ह्यातील वकील, चार्टर्ड अकौटंट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रतिनिधी व अधिकारी यांची एक स्थायी समिती स्थापन करण्याची सूचना केली. या समितीच्या बैठका दर महिना घेऊन लोकांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांना सुकर होण्यासाठी सुरु केलेल्या करप्रणालीचे आकलन करुन सुविधा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विक्रीकर सहाआयुक्त रविराज जाधव यांनी सिंधुदुगार्तील करदात्यांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी जीएसटी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच उपस्थित करदात्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील उद्योजक विक्रेते, दुकानदार, औषध विक्रेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.