शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच महामार्गाचे काम

By admin | Updated: February 1, 2016 00:42 IST

नारायण राणे : आंबेगाव येथे मंदिराचा जीर्णोद्धार

सावंतवाडी : कोकणचा खरोखरच विकास करायचा असेल, तर कोकणात रेल्वे वर्कशॉप, इंजिनियरिंग, पॉवर प्रोजेक्टचे प्रकल्प आणा. मात्र, कोकणात अणुऊर्जा केमिकलसारखे प्रकल्प आणून कोकण अधोगतीकडे नेण्याचा युती सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. इंदापूर ते झाराप महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी काँग्रेसनेच पाठपुरावा केला. आता भाजप फक्त भूमिपूजन करून ठेकेदार नेमण्याचे काम करेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आंबेगाव येथे श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर जीर्णोध्दार भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला. या मंदिराचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, आंबेगाव माजी सरपंच वासुदेव परब, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, रविंद्र मडगावकर, प्रमोद गावडे, राजन भगत आदी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, जेवढे आपण देवाला महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व शिक्षणालाही द्या. आजच्या युगात मुलांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उद्याच्या लढायाही संगणकानेच होतील, एवढी क्रांती आजच्या काळात संगणकांनी केली आहे. यामुळे या देवळाच्या बाजूला संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे, यासाठी आपण आवश्यक ती मदत करू, असे सांगितले. योग्य वेळेत मुलांना योग्य ते ज्ञान दिले, तर कर्तृत्ववान नागरिक उद्याच्या काळात संबोधले जातील. जिल्ह्यात विकासालाही खिळ बसली असून, शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये कपातीचे धोरण सरकारने अवलंबल्याने शिक्षणाचाही दर्जा खालावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री या पदाची शान गेली असून, नियोजन बैठकीतून उठून जाणारा कधी पालकमंत्री असू शकतो का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही जिल्ह्याचा विकास करताना स्वार्थ ठेवला नाही. त्यामुळे आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्याकडे येतात. उद्योगमंत्री असताना अनेकांना रोजगार दिला. पण युती सरकार आले आणि अच्छे दिनासाठी आम्हाला पंचांग घेऊन बसावे लागते. तरीही यांचे अच्छे दिन येत नाहीत, अशी कोपरखळी भाजपला मारली. डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी युती शासनावर सडकून टीका केली. पालकमंत्री घोषणा करतात, पण प्रत्यक्षात काय करीत नाहीत. म्हणून जनतेने आता सावध व्हावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. सल्लागार समितीचे अध्यक्ष वासुदेव परब यांनी, गावाच्या विकासासाठी राणे यांच्या कारकिर्दीत कोट्यवधी रूपयांची कामे झाली असल्याचे सांगितले. (वार्ताहर) असा राणे होणे नाही मी कधीही कोणाच्या टक्केवारीत नाही. माझ्यावर कसला आरोप नाही, मी कुणाकडे जेवतही नाही. मग माझ्या विरोधात वातावरण का निर्माण केले जाते, असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी करीत जिल्ह्यात माझ्यासारखे काम कोणी केले नाही आणि कोण करणारही नाही, असा नारायण राणे पुन्हा होणे नाही, असे भावोद्गार राणे यांनी यावेळी काढले.