शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रोखला : आदेशाने कुडाळात भातखरेदी

By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST

भात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही

कणकवली : भात गोदामे खाली करण्यासाठी कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. कणकवलीत आमदार नीतेश राणे यांनी स्वत: आंदोलनात सहभाग घेतला. कणकवलीत राष्ट्रीय महामार्ग आणि बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावर रास्तारोको करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार राणे यांच्यासह जिल्हाभरातून एकूण ९७ कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीने कुडाळ येथे गोदामातील भात खरेदी केली. आंदोलनाचा परिणाम म्हणून भात खरेदी सुरू झाल्याचा दावा कॉँग्रेसने केला.कणकवलीत आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रस्ता रोकोमुळे दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. तर बांदा येथे तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कणकवलीत ७२ कार्यकर्त्यांना तर बांद्यात २५ जणांना अटक केली. यापुढे कोकणातील जनतेला जिल्हाधिकाऱ्यांनी धमकी दिली तर महाराष्ट्रात त्यांना कुठेही फिरू देणार नाही. त्यामुळे त्यांनी येथील जनतेबद्दल बोलताना विचार करूनच बोलावे, असा इशारा आमदार राणे यांनी दिला. या आंदोलनामुळे येथे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांची यामुळे दमछाक झाली.गाडी पेटवलीभात गोदामासमोर आंदोलन सुरू असताना तेथूनच काही अंतरावर महामार्गावर एमएच ०४, ए- ९१९७ या क्रमांकाची मारूती कार अज्ञातांनी पेटवली. त्यामुळे आगीच्या भडक्याबरोबरच धुराचे लोळ पसरले होते. टायरनी पेट घेतल्याने बराचवेळ गाडी पेटत होती. मात्र हे कृत्य कोणी केले? हे समजू शकले नाही. तहसीलदारांशी चर्चाभात खरेदीबाबत तहसीलदार समीर घारे यांनी लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करीत महामार्गावर आंदोलकांनी ठाण मांडले. मात्र, शासनाकडून तसा आदेश आल्याशिवाय आपण लेखी आश्वासन देऊ शकत नाही, असे तहसीलदारांनी सांगितले.पोलीस महानिरीक्षक सावंतवाडीत काँग्रेसच्यावतीने आमदार नीतेश राणे यांनी ‘सिंधुदुर्ग गोदाम खाली’ आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे बुधवारी सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले. त्यांनी काहीवेळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात थांबून ते ओरोसकडे गेले.वनविभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोकोपोलीस आंदोलकांना कणकवली पोलीस स्थानकात घेऊन जात असताना वनविभागाच्या कार्यालयासमोरील महामार्गावर काही आंदोलक तसेच शेतकऱ्यांनी भाताची पोती ठेवून रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. ही पोती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस मोकळा करण्यात आला. तसेच आंदोलकांना पोलीस स्थानकात आणण्यात आले.