शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

हायस्पीड बोटी सील होणार !

By admin | Updated: December 26, 2015 00:17 IST

विधानसभेत खडसेंचे उत्तर : पारंपरिक मच्छिमारांकडून वैभव नाईक यांचा सत्कार

मालवण : मालवण बंदरात घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या कर्नाटकातील तीन हायस्पीड बोटींना मत्स्य, पोलीस व मच्छिमार यांनी संयुक्त कारवाई करून मालवण बंदरात अवरुद्ध करून ठेवले होते. त्या बोटी रातोरात पळून गेल्या. याबाबत विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मत्स्योद्योग मंत्री एकनाथ खडसे यांनी मत्स्य आयुक्त व जिल्हाधिकारी यांना संबंधित बोटी मिळताच सील करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. मालवणच्या शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आचरा मच्छिमार राडाप्रकरणी अनेक मच्छिमारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. सकारात्मक चर्चेअंती मच्छिमारांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत प्रयत्न केले जातील. आंबा, काजू नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात लवकरच शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल. त्यांच्या समस्या दूर करून नुकसानभरपाई मिळविण्यात सहकार्य करण्यात येईल. तारकर्ली देवबागला स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी ठाम आहोत, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत सभागृहात आवाज उठवून मत्स्योद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून प्रश्न आमदार नाईक यांनी तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत मच्छिमारांना न्याय मिळवून दिला. त्याबाबत मालवणातील पारंपरिक मच्छिमारांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नाईक यांनी मच्छिमारांनी न्याय देण्यासाठी मंत्री खडसे यांना जिल्हा दौऱ्याचे आमंत्रण दिले असून जानेवारी अखेरीस ते दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ मच्छिमार नेते रमेश धुरी, छोटू सावजी, दिलीप घारे, सन्मेश परब, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, रश्मिन रोगे, प्रदीप रेवंडकर, सेजल परब, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तारांकित प्रश्नांना सकारात्मक न्यायसभागृहात सर्वाधिक तारांकित प्रश्न आपल्या माध्यमातून विचारले गेले. त्याला सकारात्मक न्याय मिळाला आहे. डॉ. सोमवंशी अहवाल तत्वत: स्वीकारून नव्याने पर्ससीन परवाने न देण्याचे धोरण असो, तसेच परप्रांतीय पर्ससीन व हायस्पीड धारक यांना एमपीडीएसारखा कायदा लावण्याबाबत सुरू असलेला विचार, तसेच समुद्री कारवाईसाठी गस्ती नौका अधिक कर्मचारी, कायदेविषयक लढा, हा सागरी अधिनियमात यावर्षी करण्यात आलेली २५ लाखांची तरतूद अडीच कोटीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सहकारी तत्त्वावरील बर्फ कारखान्यांना पूर्वी असलेले इंडस्ट्रीयल वीज बिल कमर्शिअल स्वरुपात येणार आहे, असे नाईक म्हणाले.