शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये हायटेक शिक्षण

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : दोन वर्षांच्या प्रयोगाला मिळतेय शाळाशाळांमधून यश

श्रीकांत चाळके-खेड -हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेने भर दिला आहे. प्राथमिक पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर पडावी, हा यामागचा हेतू आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, आता अशा शाळांची संख्या कमी झाल्याने खेड तालुक्यातील संगणक असलेल्या ८३ शाळांना याचा लाभ झाला आहे़ खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत़ त्यातील ८५ प्राथमिक शाळांमधील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम हाती घेतली होती़ त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होऊ शकले़ त्यापाठोपाठ आजच्या गतिमान शिक्षण प्रणालीच्या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्र्थ्यांना ओढण्यासाठी जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगणक उपलब्ध करून दिले गेले. मात्र, वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे त्याचा लाभ शाळांना मिळत होता. शासनाकडून मिळणाऱ्या ४ टक्के सादील निधीतून आवश्यक सुविधा मिळत होत्या. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसह विविध बिलेही थकली आहेत़ ४ टक्के सादील योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतूनच ही बिले भरली जातात. मात्र, हा निधी न मिळाल्याने बिले भरलेली नाहीत़ वीजबिलांना वाणिज्य दर लावण्यात आल्याने ती भरणेही ग्रामस्थांना अशक्य झाले़ त्यामुळें गेल्या दोन वर्षात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. खेड तालुक्यातील अल्प शाळांमध्ये आता वीजबिले न भरण्याचे प्रमाण राहिले. मात्र, आता या तालुक्यातील शाळांमध्ये पुन्हा हायटेकपध्दतीने शिक्षण देणे विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. अशा शाळांमध्ये नवनवीन प्रयोग सादर करण्यास तेथील शिक्षक, पालक सदैव तत्पर असल्याचे सांगण्यात येते.बिले वाणिज्य दराने नाही...वीज जोडण्या तोडल्यानंतर पुन्हा जोडल्या.प्राथमिक शाळांमध्ये संगणक शिक्षण.शाळांची बिले न भरल्याने संगणक प्रणालीवर झाला होता परिणाम. वाणिज्य दराने शाळांची बिले तयार झाल्याने ती भरणे ग्रामस्थानाही अशक्य. आता सुकर खेड तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानामधून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, मधल्या काळात वीजबिल न भरल्याने शाळा हायटेक करण्याला थोडा ब्रेक लागला होता.