शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुक अर्ज भरण्यासाठी प्रत्येक तहसिलमध्ये मदत कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 13:31 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३२५ ग्रामपंचायतींसाठी होणाºया निवडणुकीसाठी आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्यात येणाºया तांत्रिक अडचणींसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३२५ ग्रामपंचायतींसाठी होणाºया निवडणुकीसाठी आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे भरण्यात येणाºया तांत्रिक अडचणींसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्रानुसार दिनांक १ सप्टेंबर व दिनांक १२ सप्टेंबर २0१७ नुसार डिसेंबर २0१७ मध्ये मुदती संपणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणुक जाहीर झाली आहे. दिनांक २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीमध्ये उमेदवारांनी आॅनलाईन भरलेली नामनिर्देशनपत्रे सकाळी ११ ते सायं ४.३0 या वेळेत संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत.

या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यांमध्येही आॅनलाईन काम सुरु असल्याने (pamchayatelection.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावरील काम मंदगतीने सुरु आहे. तथापि दिनांक २७ सप्टेंबर २0१७ पासून या संकेतस्थळावरील कामाची गती वाढेल अशी अपेक्षा राज्य निवडणुक आयोगाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर असून यादिवशी संकेतस्थळाचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन भरलेलीच नामनिर्देशनपत्र स्विकारण्याच्या सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या असल्याने इच्छुक उमेदवारांनी अंतिम दिनाकांपूर्वी लवकरात लवकर नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरुन ते संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत दाखल करावे.संबंधित संकेतस्थळ हे दिवसाचे २४ तासही सुरु असल्याने इच्छुक उमदवारांना कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरल्यास संकेतस्थळावरील भार कमी असल्याने त्यावेळी नामनिर्देशन आॅनलाईन भरण्याची प्रक्रीया वेगाने होवू शकते.आॅनलाईन भरलेले नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायं ४.३0 वाजेपर्यंत असून या दिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरुन झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे सकाळी ११ ते सायं ४ या वेळेत दाखल करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये एक मदत कक्ष तयार करण्यात आलेले आहे. त्याचा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देनपत्र भरताना काही तांत्रिक अडचण उद्धभवल्यास त्यांनी त्यांच्या तालुकानिहाय क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.