शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधांसाठी मदत करा

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

कोकण विकासावर चर्चा : आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी

रत्नागिरी : मुंंबई कोकण वैधानिक विकास मंडळ स्थापन करून पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव मदत करा, ही मदत पॅकेजरूपी नको, तर गुंतवणूक म्हणून करावी, अशी आग्रही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली.कोकण विकासाच्या प्रस्तावावर चर्चेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. आमदार जाधव यांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पहिल्यांदाच कोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही चर्चा महत्वाची मानली जात आहे.कोकणच्या विकासावर चर्चा होण्यासाठी आमदार जाधव यांनी चालू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. ३१ मार्च रोजी त्यांनी प्रस्ताव मांडला होता, आज तो चर्चेला आला. या चर्चेची सुरुवातही जाधव यांनी केली. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी कोकणच्या विकासासाठी काय करायला हवं, याबाबतच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या. अतिवृष्टी झाली, वादळ-वारा झाला, पाऊस कमी पडला, पिके धोक्यात आली, नुकसान झालं, तर आक्रस्ताळेपणा करून कोकणी माणूस कधी मदतीसाठी हात पसरत नाही, कर्जमाफी करा, असं म्हणत नाही. त्यामुळे सरकार कोकणला अशी मदत करू शकत नसेल तर कोकणच्या विकासाकरिता, पायाभूत सुविधांकरिता मदत करावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीलाच केली.पर्यटनस्थळांचा विकास, फळांवरील प्रक्रिया आणि मत्स्य व्यवसाय हे डॉलर म्हणजे परकीय चलन मिळवून देऊ शकतात. पण, डॉलर भूमी असलेले कोकण आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहे. शासनाने गुंतवणूक किंवा कर्ज म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी दहा वर्षे मदत करावी. त्यामुळे भविष्यात कोकण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भार उचलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग पूर्णत्वास न्यावेत, सागरी जलवाहतूक सुरू करावी, कोकणातील केमिकल झोन, औष्णिक उर्जा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी, पर्यटन विकासासाठी विमानतळांचा विकास करावा, कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मत्स्यविद्यापीठ, मेरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारावेत, प्रदूषणकारी कारखान्यांऐवजी कोकणात इंजिनियरिंग, फळप्रक्रिया कारखाने, टेक्स्टाईल पार्क, लॉजिस्टिक बेस उद्योग आणावेत, अशी आग्रही मागणी आमदार जाधव यांनी केली.जाधव यांनी मच्छीमारांच्या घरांखालील जागा त्यांच्या मालकीची करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली.बंदरांचा विकास, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प यावरही त्यांनी भाष्य केले. कोकणात समुद्रबळींची संख्या कमालीची वाढली असून, ही बाब अत्यंत चिंंत्तादायक व पर्यटन विकासाला मारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. गोव्याच्या धर्तीवर उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार जाधव यांनी कोकणच्या मातीतून घडलेल्या नररत्नांचा उल्लेख करून वैभवशाली परंपरा लाभलेलं कोकण उर्वरित महाराष्ट्राच्या नावाखाली मागास राहिल्याचे सांगितले. मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा प्रगत भागाला कोकण जोडण्यात आल्याने कोकणचा अनुशेष दिसून येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.आता कोकणच्या सर्वांगिण विकासाचा आराखडाच तयार करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. कोकणच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उत्तर देणार असून, आमदार जाधव यांनी मांडलेल्या प्रश्नांवर ते कोणता न्याय देतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.(प्रतिनिधी)पर्ससीन : बंदीकाळात नव्याने निर्णय घ्याकोकणातील पर्ससीनेट मच्छीमारांवर घालण्यात आलेल्या बंदीवर तात्पुरती स्थगिती देऊन पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या काळात नव्याने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी यावेळी केली...आमदार अनुपस्थितकोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली असताना कोकणातील शिवसेनेचे काही आमदार मात्र अनुपस्थित होते.