शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला मदत; पोलिसावरच गुन्हा दाखल

By admin | Updated: April 2, 2017 23:27 IST

आरोपीला मदत; पोलिसावरच गुन्हा दाखल

रत्नागिरी : खासदार व आमदारांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या संतोष दगडू नारायणकर (वय ५४, बीड) या संशयिताला पैसे घेऊन मदत करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबलविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास गजानन नाटेकर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर या अगोदरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लवकरच नाटेकर याला ताब्यात घेण्यात येणार आहे.संतोष नारायणकर याने अनेक खासदार व आमदारांची नावे घेत शासकीय कामाच्या निविदा भरून शासनाची फसवणूक केली होती. त्यामध्ये खेड तालुक्यातील एका निविदेचाही समावेश होता. त्याने आमदार, खासदारांच्या नावाने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीनिवास नाटेकर व पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांना राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी संतोष नारायणकर याला पकडले; परंतु त्याला अटक न करता त्याच्याकडून हजारो रुपये घेऊन ते रत्नागिरीत परत आले व शहर पोलिस स्थानकात तो सापडला नसल्याचा खोटा रिपोर्ट सादर केला.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्याकडे देण्यात आला; परंतु हे पथक राजस्थानला निघण्यापूर्वीच श्रीनिवास नाटेकर याने संतोष नारायणकर याला दूरध्वनीवरून ‘तुझ्या शोधासाठी एक पथक राजस्थानला येत असून तू पळून जा’, अशी माहिती या आरोपीला दिली. त्याचबरोबर आपला बँक खाते क्रमांक देऊन त्यावर पैसे टाकण्याची मागणी केली; परंतु संतोष नारायणकर याच्या अटकेनंतर नाटेकर याचे बिंग सर्वांसमोर फुटले. जिल्हा पोलिस दलाचा विश्वासघात करणाऱ्या श्रीनिवास नाटेकर याला अटक करण्यासाठीचा अर्ज पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यावर चर्चा झाल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व उपविभागीय अधिकारी जयश्री गायकवाड या वरिष्ठांच्या संमतीने सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार श्रीनिवास नाटेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विनित चौधरी करीत आहेत. (वार्ताहर)