शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: June 6, 2014 00:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८.६३ मि. मी. पाऊस : घरावर झाडे कोसळून दीड लाखांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. २८.६३ मि.मी.च्या सरासरीने पडलेल्या पावसामुळे व वादळी वार्‍यामुळे विविध ठिकाणी घरांवर झाडे पडून सुमारे १ लाख २९ हजार ७६० रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ५०.२५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वात जास्त मालवण तालुक्यात १२८ मि. मी. एवढा तर सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात १९ मि. मी. एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच अन्य तालुक्यात दोडामार्ग ६० मि. मी., सावंतवाडी ४४ मि. मी., वेंगुर्ला २७ मि.मी., कुडाळ ७१ मि.मी., कणकवली २३ मि.मी. तर देवगड तालुक्यात आतापर्यंत ३० मि.मी. पाऊस पडला आहे.बुधवारी रात्री प्रचंड विजेचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घरांवर झाडे पडून घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी जिल्ह्यात २८.६३ च्या सरासरीने पाऊस कोसळला. यामध्ये देवगड २० मि. मी., वैभववाडी १ मि. मी., कणकवली ७ मि. मी., कुडाळ ४६ मि.मी., सावंतवाडी ३३ मि. मी., मालवण १०८ मि. मी., वेंगुर्ला १४ मि. मी. तर दोडामार्ग तालुक्यात पाऊस पडलेला नाही. बुधवारी सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांना वादळी वार्‍याचा तडाखा बसला. या वादळी वार्‍यामुळे घरांचे सुमारे १ लाख २९ हजार ७६० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील यशवंत संभाजी पराडकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडून ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सावंतवाडी तालुक्यात एकूण ११ घरांची अंशत: पडझड होऊन नुकसानी झाली. यामध्ये लक्ष्मण सावंत यांच्या घराचे ३६२० रुपयांचे नुकसान झाले आहे. गोपाळ सावंत २९२० रुपये, पार्वतीबाई घोगळे २४०० रुपये, वसंत सावंत २७८० रुपये, आत्माराम सावंत १५०० रुपये, विश्राम सावंत ३ हजार रुपये, सखाराम सावंत-भोसले १५०० रुपये, बापू तांबोळकर ८ हजार रुपये, भगवान सावंत २ हजार रुपये, अक्षता देसाई २५०० रुपये आदी नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. (प्रतिनिधी)