शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचिंगप्रकरणी आरोग्यसेवक अटकेत

By admin | Updated: November 26, 2015 23:55 IST

खारेपाटण येथील घटना : युवतीची तक्रार

कणकवली : तालुक्यातील नडगिवे येथील युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पसार झालेल्या चोरट्याला तब्बल पाच दिवसांनंतर पाळत ठेवून ग्रामस्थांच्या साहाय्याने पोलिसांनी पकडले. राजापूर तालुक्यातील केळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून तो कार्यरत आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, नडगिवे गावठणवाडी येथील कोमल जगदीश सावंत (वय १६) ही विद्यार्थिनी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मावशीला नडगिवे बसस्टॉपवर सोडून घरी चालली होती. यावेळी दुचाकी (एम.एच. ०९ जे ९२६०) वरून आलेल्या चालकाने वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारणा करण्याचा बहाणा केला आणि युवतीच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पोबारा केला होता. कोमलने चोरट्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या तोंडावर हात मारून दुखापत केली. याबाबत तिने खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. बी. रावराणे, हवालदार पी. एस. तुपसुंदर, एस. ए. कदम हे शोध घेत होते. बुधवारी (दि. २५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक युवक चोरीच्या उद्देशाने पुन्हा खारेपाटण परिसरात दाखल झाला. खारेपाटण गुरववाडीनजीक आल्यावर पुन्हा त्याच पद्धतीने दुचाकीवरून रस्त्यावरून चालणाऱ्या एका युवतीच्या दिशेने दागिने चोरीच्या उद्देशाने येऊ लागला; परंतु युवतीला त्याचा संशय आल्याने तिने गुरववाडीतील ग्रामस्थांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अधिक चौकशी केल्यानंतर दुचाकीस्वार पद्माकर अनुरथ घाडगे (वय ३३, रा. केळवली, शेंगाळेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) मूळ राहणार उस्मानाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने २१ नोव्हेंबरला नडगिवे येथून आपणच सोन्याची चेन खेचून पोबारा केल्याची कबुली दिली. पद्माकर घाडगे हा केळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच त्याच्याजवळील मोटारसायकलचा क्रमांक एम. एच. १०, एजे ९२६० असल्याचे आढळून आले. (वार्ताहर)सिंधुदुर्गसह रत्नागिरीत खळबळगेली सहा वर्षे तो आरोग्यसेवक म्हणून केळवली येथे काम करीत आहे. तसेच उरलेल्या वेळेत चेन स्नॅचिंग करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. चेन स्नॅचिंगप्रकरणी आरोग्यसेवकाला अटक झाल्याने सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. घाडगे याच्या अटकेमुळे आणखीन काही चेन स्नॅचिंगची प्रकरणे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.