शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मुख्याध्यापिका ठार

By admin | Updated: August 5, 2014 00:11 IST

ट्रकचालक ताब्यात : कणकवलीत महामार्गावर घटना

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात अपर्णा अरविंद साटम (वय ४९) या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे घडली. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपर्णा साटम या येथील कलमठ लक्ष्मणनगर येथे राहत होत्या. आज सकाळी कलमठ येथून कळसुली भोगनाथवाडी जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी त्या दुचाकी (एमएच ०७ वाय ९००५)वरून निघाल्या होत्या. यावेळी ट्रकचालक संतोष श्रीरंग गोरे (३८, रा. सातारा) हा ट्रक (एमएच १२ एच क्यू ७९६७) घेऊन पुण्याहून गोव्याला निघाला होता. यावेळी महामार्गावरील रामेश्वर प्लाझासमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये अपर्णा साटम या दुचाकीसह रस्त्यावर कोसळून ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना अपर्णा साटम यांनी आपल्या घरचा दूरध्वनी क्रमांक देऊन कुटुंबीयांना अपघाताबाबत माहिती देण्यास सांगितले व त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर साटम यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली.कळसुली भोगनाथवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या अपर्णा साटम यांचे माहेर कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे असून, त्यांचे पूर्वीचे नाव ललिता धोंडू सावंत असे आहे. मालवण तालुक्यातील कोईळ चारिवडे येथे सासर असलेल्या अपर्णा साटम सध्या कलमठ लक्ष्मणनगर येथे राहात होत्या. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच या गावांवर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती गिर्ये येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेबाबत अधिक तपास पोलीस हवालदार रविकांत अडुळकर करीत आहेत. (वार्ताहर)