शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

झोळंबेच्या सरपंचांना माकडताप?

By admin | Updated: February 11, 2016 00:35 IST

आरोग्य पथक दाखल : रक्ताचे नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला; तळकट येथे सापडले मृत माकड

कसई दोडामार्ग : झोळंबेचे सरपंच सतीश कामत यांना माकडताप झाल्याची शक्यता असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले असूून, कामत यांच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. साळे यांनी दिली.तळकट व झोळंबे येथे बैठक घेऊन माकडतापाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तळकट परिसरात लाल तोंडाचे माकड मृतावस्थेत सापडल्याने माकडतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. केर येथील माकडतापाची साथ आटोक्यात येत असतानाच तळकट हॉस्पिटलमध्ये माकडतापाचा संशयित रुग्ण आढळला आहे. झोळंबेचे सरपंच सतीश कामत यांना ताप आल्यानंतर तपासणी केली असता माकडतापाची लक्षणे दिसून आली. ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी आरोग्य अधिकारी डॉ. साळे, तालुका अधिकारी तुषार चिपळूणकर तळकट येथे दाखल झाल्यानंतर माकडतापाबाबत तळकट झोळंबे येथे बैठक पार पडली.संशयित रुग्णांचे व गोचिडीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तापाची लक्षणे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, आदी अन्य तापांसारखीच असल्याने त्याचे निदान लवकर होत नाही. हा ताप कुठला आहे, याचे निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. (वार्ताहर)माकडताप नियंत्रणासाठी जनावरांच्या गोठ्यात औषध फवारणी करण्याचे आवाहनडॉ. साळे यांनी ग्रामस्थांना माकडतापाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी माकडताप हा गोचीड चावल्याने होत असून, यासाठी गोचीड निर्मूलनाचे आवाहन केले. माकडांना विषारी गोचीड चावल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. या गोचिडी पाळीव जनावरांना लागून त्याद्वारे या तापाची लागण सर्वत्र होते. पाळीव जनावरांच्या अंगावरील एक मोठी गोचीड सुमारे दीड हजार अंडी देते. माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी गोचिडी नष्ट केल्या पाहिजेत. त्यासाठी गॅमा बी.एच. सी. पावडर संबंधित परिसरात व जनावरांच्या गोठ्यात फवारण्याचे आवाहन केले. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.