शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाला सील ठोकणे हा नगराध्यक्षांचा दळभद्रीपणाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:44 IST

विनायक राऊत यांच्याकडून समाचार : सभागृहातच सादरीकरण करण्याची सेना नगरसेवकांची भूमिका अयोग्य

रत्नागिरी : पालिकेच्या सभागृहाचेही काही नियम आहेत, सभागृहाचा मान प्रत्येकाने राखला पाहिजे. काहीही झाले तरी प्रेझेंटेशन सभागृहातच करणार, अशी काही नगरसेवकांनी घेतलेली भूमिका चुकीची होती. त्याचबरोबर सील ठोकून नगरपरिषद सभागृह बंद ठेवणे, हा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचा वैचारिक दळभद्रीपणा असून, ही बाब दुर्दैवी आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी नगरपरिषदेत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत तीव्र नापसंती व्यक्त केली. पाणी योजनेच्या सादरीकरणानंतर उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांच्या दालनात त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. येथे पक्षीय वादंगाचा प्रश्न मुळीच नाही. पाणीपुरवठा योग्यरित्या होणे, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुबलक पाणी पुरवठा हवा, ही शहरवासीयांची मागणी आहे. रत्नागिरी हे भविष्यात अधिक विस्तारणारे शहर आहे. त्यामुळे योजना बनविताना लाखाची नव्हे; तर सव्वा ते दीड लाख लोकांसाठी बनवावी, अशी सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक वर्षात विस्कळीत आहे. पाणी वाटपातही अनियमितता आहे. मुबलक पाणी असूनही वितरण व्यवस्था ठप्प असल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे जो पाणी आराखडा तयार केला आहे, त्याची माहिती लोकप्रतिनिधींना व्हावी, म्हणून हा आराखडा पाहणीचा प्रपंच आहे. त्यातून आराखड्यातील त्रुटीही दूर करणे शक्य होणार आहे, असे खासदार राऊत म्हणाले. प्रस्ताव शासनाकडे गेला असला तरी योजनेला सुकाणू समितीची मान्यता नाही. त्यातील त्रुटी दूर होऊन परिपूर्ण प्रस्ताव सुकाणू समितीसमोर जावा म्हणून आम्ही सूचना दिल्या आहेत. पानवलच्या धरणाचे पाणी ही दैवी देणगी आहे. धरणाची उंची वाढविणे आवश्यक आहे तसेच धरणाला मोठी गळती असून, ते पूर्णत: दुुरुस्त करण्याची गरज आहे. धरणातील गाळ उपसाही करावा लागेल. सध्या दीड मीटर उंची तात्पुरती वाढवली आहे. परंतु ती कायमस्वरुपी वाढवण्याची व्यवस्था करावी. योजनेत २१ दशलक्ष लीटर पाणी गृहीत धरण्यात आले आहे. शीळची जॅकवेल अधिक जवळ उभारली जाणार आहे. ११० किलोमीटर लांबीची जलवाहिनी ही न गंजणाऱ्या धातूची वापरली जाणार आहे. शहरात १५ ठिकाणी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवून जनतेला माहिती दिली जाणार आहे. सूज्ञ नागरिकांकडून आणखी चांगल्या सूचना आल्यास त्यांचा आराखड्यात समावेश व्हावा, असेही अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रश्नावरून सेनेने वातावरण भडकावण्याचे काम कधीही केलेले नाही. यावेळी सेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे, बंड्या साळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)